LPG Gas Price : महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडरच्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत. या दर कपातीचा कशावर नक्की परिणाम झाला आहे, ते जाणून घेऊ.
दिल्ली : 01/12/2025
आज 1 डिसेंबरला व्यावसायिक आणि एलपीजी सिलिंडर आणि घरगुती एलपीजी (LPG Gas Price) सिलिंडरच्या नवीन किंमती जाहीर कऱण्यात आल्या आहेत. तेल आणि गॅस कंपन्यांनी आज 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमती कमी केल्या गेल्या आहेत. 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरसाठी ही दर कपात साधारण समजली जात आहे. एलपीजी सिलिंडरच्या किंमती दर महिन्याच्या पहिल्या दिवशी बदलत असतात.
Table of Contents
कितिने कमी झाले दर ? ( LPG Gas Price )
19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 10 रूपयांची कपात करण्यात आली आहे. यापूर्वी गेल्या महिन्यात ही किंमत फक्त 5 रुपयांची होती. सप्टेंबरमध्ये लक्षणीय वाढ करण्यात आली होती. कमी केलेले दर आजपासून लागू होतील. दिल्लीत किंमत 1590.50 वरून 1580.50 पर्यंत कमी केली आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 853 ही कायम आहे.
मासिक आढावा (LPG Gas Price)
तेल आणि गॅस कंपन्या दरमहा एलपीजी सिलिंडरच्या किंमतींचा आढावा घेतात. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी नवीन दर जाहीर करतात. व्यावसायिक गॅस सिलिंडरसाठी ही सलग दुसरी करण्यात आलेली कपात आहे. यापूर्वी ऑक्टोबरमध्ये किंमती 15.50 ने वाढवण्यात आल्या होत्या. त्याआधीही सतत कपात करण्यात आलेली आहे.
19 किलोच्या सिलिंडरच्या किंमती (LPG Gas Price)
- मुंबई – रुपये 1531.50
- दिल्ली – रुपये 1580.50
- कलकत्ता – रुपये 1684.00
- चेन्नई – रुपये 1739.50
घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल नाही (LPG Gas Price)
तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमती बदलल्या नाहीत. याचा अर्थ ग्राहकांना घरगुती एलपीजीसाठी कोणताही अतिरिक्त खर्च करावा लागणार नाही. देशभरातील प्रमुख किंमती खालीलप्रमाणे आहेत.
- मुंबई : रुपये 852.50
- दिल्ली : रुपये 853
- लखनौ : 890.50
- वाराणसी : रुपये 916. 50
- अहमदाबाद : 860
- हैद्राबाद : रुपये 905
- पटना : रुपये 951
या किंमतीमध्ये सतत स्थिरता राहिल्याने घरगुती ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषतः अशावेळी जेव्हा अतर अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढत आहेत.
कोणाला होणार फायदा ?
एलपीजी दर कपातीचा फायदा हॉटेल, रेस्टॉरंट आणि अन्नाशी संबंधित व्यवसायांशी संबंधित लोकांना होणार आहे. घरगुती गॅस वापरणाऱ्यांसाठी याचा कोणताही फायदा होणार नाही.