Lord Shriram Statue Goa : गोवा दौऱ्यात श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जिवोत्तम मठामध्ये भेट दिली. या मठाला 550 वर्षे पूर्ण झाली आहेत. या मठाच्या परिसरात आज एक ऐतिहासिक सोहळा पार पडला. जाणून घेऊयात संपूर्ण सोहळ्याची माहिती.
गोवा : 28/11/2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी गोवा दौऱ्यावर आहेत. त्यांनी गोवा दौऱ्यात श्री संस्थान गौकर्ण पर्तगाळी जिवोत्तम मठामध्ये भेट दिली. या मठाला 550 वर्षे पूर्ण झाली आहेत. या मठाच्या परिसरात आज एक ऐतिहासिक सोहळा पार पडला. मठाच्या 550 वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भव्य श्री राम मूर्तीचे (Lord Shriram Statue Goa) अनावरण केले.
मर्यादा पुरूषोत्तम श्रीरामांच्या 77 फूट उंच भव्य मूर्तीचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. भगवान श्रीरामांची ही मूर्ती आशिया खंडातील सर्वात भव्य मूर्ती असणार आहे. यामुळे काणाकोन भागाच्या विकासाला मदत होणार आहे. या परिसराचा धार्मिक पर्यटन म्हणून विकास होणार आहे.
श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जिवोत्तम मठाच्या परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या सोहळ्याला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि अन्य वरिष्ठ नेते उपस्थित होते. प्रभू श्रीरामांची मूर्ती शिल्पकार राम सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली कऱण्यात आली आहे. या मूर्तीच्या परिसरात संग्रहालय देखील उभारले जाणार आहे.
नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिरावर ध्वजारोहण (Lord Shriram Statue Goa)
नुकताच आयोध्येत बांधलेल्या भव्य श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या शिखरावरही भगवा ध्वज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते फडकवण्यात आला. पंतप्रधान मोदींनी शुभ मुहूर्तावर 22 फूट लांब, 11 फूट रूंद आणि अंदाजे 3 किलो ध्वज फडकवला. यावेळी पंतप्रधान मोदींनी सांगितले की, “आज, अयोध्या शहर भारताच्या सांस्कृतिक जाणिवेतील आणखी एक वळण पाहत आहे.
श्रीराम जन्मभूमी मंदिरात ध्वजारोहण सोहळ्याचा हा क्षण अद्वितीय आणि असाधारण आहे. हा धर्मध्वज केवळ एक ध्वज नाही, तो भारतीय संस्कृतीच्या पुनर्जागरणाचा ध्वज आहे. हा ध्वज संघर्षांतून निर्माण झालेल्या निर्मितीची गाथा आहे. शतकानुशतके जुन्या स्वप्नांचे मूर्त स्वरूप आहे. संतांच्या आध्यात्मिक साधना आणि समाजाच्या सहभागाचा अर्थपूर्ण कळस आहे.”
मोदी म्हणाले की, ” आपण असा समाज निर्माण करूया जिथे गरीबी नसेल, कोणीही दुःखी किंवा असहाय्य नसेल. जे काही कारणास्तव मंदिरात येऊनही दूरवरून मंदिराच्या ध्वजाला आदरांजली वाहण्यास असमर्थ आहेत, त्यांनाही तेच पुण्य मिळते. हा धर्मध्वज या मंदिराच्या ध्येयाचे प्रतीक आहे. हा ध्वज दूरवरून राम लल्लाच्या जन्मस्थानाची झलक देईल. तो येणाऱ्या युगानुयुगे सर्व मानवजातीला श्री रामाच्या आज्ञा आणि प्रेरणा देईल. या अनोख्या प्रसंगी मी जगभरातील लाखो रामभक्तांना माझ्या शुभेच्छा देतो.”