Translate :

Sponsored

Leopard In Pune , Breaking News : बिबट्याने दिले पुण्यातील ‘औंध’मध्ये दर्शन, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण : Leopard Spotted In Aundh residential Society In Pune

पुण्याच्या औंध परिसरात बिबट्याने दर्शन दिले आहे. (फोटो - सोशल मीडिया )

Leopard In Pune : पुणे शहरातील औंध परिसरात बिबट्या दिसल्याचे समोर आले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये बिबट्या कैद झाला आहे. बिबट्या दिसल्याची माहिती मिळताच वनविभागाने औंध परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे.

पुणे : 24/11/2025

पुणे, अहिल्यानगर अशा काही जिल्ह्यांमध्ये सध्या बिबट्याच्या  (Leopard In Pune)  नागरभागातील वावर वाढला आहे. पुणे जिल्ह्यातील जु्न्नर, शिरूर आणि शहर परिसरात बिबट्याने दर्शन देणे सुरू आहे. पुणे विमानतळ परिसरात, सिंहगड रस्ता येथे बिबट्याने दर्शन दिले आहे. मात्र आता बिबट्याने थेट पुण्याच्या शहरी भागात दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या बिबट्याच्या समस्येमुळे वन विभागासह, नागरिकांची झोप उडवली आहे. पुण्याच्या औंध परिसरात बिबट्याने दर्शन दिल्याता व्हिडिओ समोर आला आहे.

पुण्यात बिबट्याचे दर्शन  (Leopard In Pune)

पुणे शहरातील औंध परिसरात बिबट्या दिसल्याचे समोर आले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये बिबट्या कैद झाला आहे. बिबट्या दिसल्याची माहिती मिळताच वनविभागाने औंध परिसरात शोध मोहिम राबवली आहे. पहाटेच्या सुमारास बिबट्या दिसल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र त्यानंतर अजूनही हा बिबट्या कुठे दिसून आलेला नाही. त्यामुळे वनविभाग त्याचा शोध घेत आहे.

त्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, बिबट्या असल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर पोलिस प्रशासन आणि वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. बिबट्या पहाटेच्या सुमारास एका सोसायटीच्या परिसरात बिबट्या दिसून आल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored