Ladaki Bahin Yojana Update : महाऱाष्ट्रातील शासनाच्या लाडक्या बहिणींना आता काही अटींची पूर्तता करणे आवश्यक केले आहे. दोन महिन्याच्या आत या अटींची पूर्तता करणे आवश्यक असणार आहे.
मुंबई : 01-10-2025
मुख्यमंत्री लाडकी बहीण ( Ladaki Bahin Yojana ) योजनेअंतर्गत आता ई-केवायसी (E-KYC) प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे योजनेची अंमलबजावणी आधिक पारदर्शक आणि सुलभ होणार आहे. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक महिला लाभार्थीला आता ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक असेल. नवीन नियमानुसार, योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक महिला लाभार्थीला आता ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक असेल. नवीन नियमानुसार, योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलांना केवळ स्वतःचे आधार कार्डच नाही, तर पतीचे आधार कार्ड देखील सादर करणे आवश्यक आहे. हा नियम योजनेतील पात्र लाभार्थ्यांची अचूक पडताळणी करण्यासाठी आणि अपात्र व्यक्तींना लाभ मिळण्यापासून रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
गैरव्यवहार कमी करण्यासाठी अट ( Ladaki Bahin Yojana )
प्रशासनाने या प्रक्रियेमुळे योजनेतील गैरव्यवहार कमी होऊन खरी गरज असलेल्यांपर्यंत लाभ पोहोचेल असे सांगितले आहे. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महिलांना दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. या निर्धारित वेळेत सर्व आवश्यक कागदपत्रांसह ई-केवायसी पूर्ण करणे प्रत्येक लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे आहे. दिलेल्या मुदतीत ई-केवायसी न केल्यास योजनेच्या लाभापासून वंचित रहावे लागू शकते, अशी सूचना प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे सर्व पात्र महिलांनी त्वरित या प्रक्रियेची पूर्तता करावी असे आवाहन करण्यात आले आहे.