Translate :

Sponsored

Ladaki Bahin Yojana Update, Warning for Benificiar : लाडकी बहीण योजनेची केवायसीची मुदत संपत आली, लाभार्थींमध्ये तणावाचे वातावरण

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची केवायसी अपडेट करण्याची मुदत संपत आली आहे.

Ladaki Bahin Yojana Update : लाडकी बहिण योजनेतील केवायसी प्रक्रियेची अंतिम मुदत आता काहीच तासांवर आली आहे. अजूनही 1 कोटी महिलांचे केवायसी बाकी असल्याने लाभार्थ्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे.

मुंबई : 17/11/2025

लाडकी बहीण योजनेबाबत ( Ladaki Bahin Yojana Update ) महत्त्वाची माहिती समोर आली असून सर्व लाभार्थ्यांसाठी केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. सरकारने यासाठी 18 नोव्हेंबर ही शेवटची तारीख निश्चित केली असून उद्या अखेरचा दिवस आहे. केवायसी पूर्ण न करणाऱ्या लाभार्थ्यांना पुढील हप्त्यांचा लाभ मिळणार नाही, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

सध्या राज्यातील सुमारे 1 कोटी 10 लाख महिलांची केवायसी प्रक्रिया बाकी असून या मोठ्या संख्येमुळे अनेक लाभार्थी महिलांमध्ये लाभ बंद होण्याची भीती निर्माण झाली आहे. योजनेची अंमलबजावणी सुरू होऊन दीड वर्ष होत असून सध्या अडीच कोटींहून अधिक महिलांना दरमहा 1500 रूपयांचा आर्थिक लाभ दिला जातो. लाभ सुरळीत सुरू राहण्यासाठी केवायसी तातडीने करून घेण्याचे आवाहन सरकारने केले आहे.

लाडकी बहीण योजनेतील ( Ladaki Bahin Yojana Update ) केवायसी प्रक्रियेची अंतिम मुदत आता काहीच तासांवर आली असताना, अजूनही सुमारे 1 कोटी महिलांचे केवायसी बाकी असल्याने लाभार्थ्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. इतक्या मोठ्या संख्येने केवायसी पूर्ण कऱणे अशक्य असल्याने मुदतवाढ देण्याची मागणी जोर धरत आहे. सरकार याबाबत काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दररोज 5 लाख महिलांची केवायसी होत असल्याचा दावा  ( Ladaki Bahin Yojana Update )

ला़डकी बहीण योजनेअंतर्गत दर दिवशी 5 लाख महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण होते, अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. आतापर्यंत 1 कोटींपेक्षा जास्त लाभार्थ्यांची केवायसी पूर्ण झाली असली तरी अजूनही कोट्यावधी महिलांचे प्रमाणीकरण शिल्लक आहे.

केवायसी न केल्यास लाभ बंद होणार ( Ladaki Bahin Yojana Update )

दरम्यान, केवायसी न केल्यास पुढील महिन्यापासून योजनेचा आर्थिक लाभ मिळणार नाही. त्यामुळे उर्वरित महिलांमध्ये मोठी धांदल उडाली आहे. आता सरकार मुदतवाढ देते का, की निश्चित केलेल्या अंतिम तारखेलाच निर्णय कायम ठेवते हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored