Translate :

Sponsored

Ladaki Bahin Yojana 2026, Good News : लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या पैशांमध्ये होणार वाढ, एकनाथ शिंदेची घोषणा, किती वाढणार रक्कम ? जाणून घ्या. : Ladaki Bahin Yojana Deputy Cheif Minister Eknath Shindes Big Announcement Will Increase The Money Received By The Beneificiary Women

लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या पैशांमध्ये होणार वाढ, एकनाथ शिंदेची घोषणा

Ladaki Bahin Yojana 2026: राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत सध्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. आता या रकमेत वाढ केली जाणार आहे. किती आहे ही रक्कम जाणून घेऊ.

पुणे : 02-02-2026

सरकारने राज्यात लाडकी बहीण योजना (Ladaki Bahin Yojana 2026 ) सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. विधानसभा निवडणुकीपूर्वी ही योजना सुरू करण्यात आली होती, या योजनेचा तत्कालीन महायुती सरकारला मोठा फायदा देखील झाल्याचं पहायला मिळालं. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं, दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी जर आमची राज्यात सत्ता आली तर आम्ही लाडक्या बहिणींच्या सन्मान निधीमध्ये वाढ करू, 1500 रुपयांएवजी 2100 रुपये देऊ, असं अश्वासन त्यावेळी महायुतीच्या काही नेत्यांकडून देण्यात आलं होतं.

मात्र आता सरकार सत्तेत येऊन दीड वर्ष  होतं आलं, तरी देखील लाडक्या बहिणींच्या सन्मान  निधीमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. आता या योजनेसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलताना मोठी घोषणा केली आहे.

किती वाढवणार रक्कम ? ( Ladaki Bahin Yojana 2026 )

त्यामध्ये आता लवकरच लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या सन्मान निधीमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  एकनाथ शिंदे हे यापूर्वी देखील एक दोनदा यासंदर्भात बोलले होते, लाडक्या बहिणींचा सन्मान निधि आम्ही 1500 रुपयांमध्ये 2100 रुपये करणार आहोत, असं त्यांनी म्हटलं होतं. दरम्यान त्यांनी आता पुन्हा एकदा मोठी घोषणा केली आहे, आम्ही लाडक्या बहिणींच्या सन्मान निधीमध्ये वाढ करणार आहोत, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता लवकरच लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या पैशांमध्ये वाढ होऊ शकते अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

योजना बंद होणार नाही  ( Ladaki Bahin Yojana 2026 )

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Ladaki Bahin Yojana) कधीही बंद पडणार नाही, या योजनेला कोणीही थांबवू शकत नाही. सत्ता येते जाते, पण नाव गेेले की परत येत नाही, असे बाळासाहेब ठाकरे सांगायचे. पैसा संपत्तीमध्ये मी किती तरी माणसांचे प्रेम कमावले आहे, हे मला महत्त्वाचे आहे. मी दिलेला शब्द पाळणारा आणि जगणारा आहे. हे महाराष्ट्रातच मनातील सरकार आहे. लाडक्या बहिणींना आम्ही लखपती करणार आहोत. आम्ही 2100 रुपये देण्याचा शब्द दिला होता, तो पूर्ण करणार आहोत, असं यावेळी शिंदे यांनी म्हटलं आहे. तसेच शेतकरी कर्जमाफीचा निर्णय देखील आम्ही योग्यवेळी घेऊ असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored