Kapil Sharma Cafe Attack In Canada : टिव्ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव म्हणजे ‘कपिल शर्मा’. त्याच्या कॅफेवर पुन्हा एकदा गोळीबार करण्यात आला आहे. आतापर्यंत त्याच्या कॅफेवर तिनदा गोळीबार करण्यात आला आहे. काय आहे प्रकरण जाणून घेऊ.
कॅनडा : 16/10/2025
प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा याच्या कॅनडामधील कॅफेवर गोळीबार (Kapil Sharma Cafe Attack) करण्यात आला आहे. यापूर्वीही दोनदा कपिल शर्माच्या कॅफे कॅप्स कॅफेवर दोन वेळा गोळीबार झाला होता. आता पुन्हा झालेल्या गोळीबारानंतर कॅफेवर एकुण तीन वेळा गोळीबार झाला आहे. या गोळीबाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तसेच या गोळीबारीची जबाबदारी पुन्हा एकदा लॉरेंस बिश्नोई गँगशी संबधित गोल्डी ढिल्लो आणि कुलदीप सिद्धू नेपाळी यांनी घेतली आहे. मनोरंजन विश्वात यामुळे खळबळ माजली आहे.
सोशल मीडियावर पोस्ट लिहून घेतली जबाबदारी (Kapil Sharma Cafe Attack)
सोशल मीडियावर पोस्ट लिहून लॉरेंस गँगने कपिल शर्माच्या कॅफेवर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी घेतली आहे. त्यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये, ” वाहेगुरू जी का खालसा, वाहेगुरू जी की फतेह. आज जो (Kaps caffe) मध्ये तिसऱ्यांदा गोळीबार झाला आहे, त्याती जबाबदारी मी, कुलवीर सिद्धू आणि गोल्डी ढिल्लों घेतो. आमचे सामान्य जनतेसोबत कोणतेही वैर नाही. ज्यांच्याशी आमचे भांडण आहे, ते आमच्यापासून दूर राहतील” असे म्हटले आहे.
याच पोस्ट मध्ये त्यांनी पुढे म्हटले आहे की, जे लोक बेकायदेशीर (दोन नंबरचे) काम करतात, लोकांना काम करवून पैसे देत नाहीत, तेही तयार राहतील. जे बॉलिवूनमध्ये धर्माविरूद्ध बोलतात, तेही तयार रहातील. गोळी कुठुनही येऊ शकते. वाहेगुरू जी का खालसा, वाहेगुरू जी की फतेह.
या आधीही झाले आहेत हल्ले (Kapil Sharma Cafe Attack )
कपिल शर्माच्या याच कॅफेवर याआधी दोनदा हल्ले झाले आहेत. पहिल्यांदा 10 जुलै आणि दुसऱ्यांदा 7 ऑगस्टला हल्ला झाला होता. त्यावेळीही जबाबदारी गोल्डी ढिल्लोंने घेतली होती. गोळीबार केल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट करत, जय श्री राम, सत श्री अकाल, राम राम सर्व बंधूंना. आज जो गोळीबार झाला तो कपिल शर्माच्या सरे येथील कॅप्स कॅफेवर झाला, त्याची जबाबदारी गोल्डी ढिल्लों आणि लॉरेंस बिश्नोई गँग घेते. आम्ही याला फोन केला होता. त्याने फोन उचलला नाही. म्हणून कारवाई करावी लागली. आजा जर उत्तर मिळाले नाही तर कावाई मुंबईत होईल असे म्हटले होते. त्यावेळी या पोस्टची खुप चर्चा झाली होती.