Great Indain Astrophysicist is No More : जगप्रसिद्ध भारतीय खगोलशास्रज्ञ आणि लेखक डॉ. जयंत नारळीकर यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन .
पुणे : 2025-05-20
भारतीय खगोलशास्रज्ञ आणि लेखक डॉ. जयंत नारळीकर ( Dr.Jayant Naralikar ) यांनी वयाच्या 86 वर्षी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील त्यांच्या रहात्या घरी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने विज्ञान, साहित्य आणि शिक्षण अशा सर्वच क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्यामुळे सामान्यांना आणि विशेषतः लहानमुलांना खगोलशास्राविषयी कुतुहल निर्माण झाले. त्यांच्या सामान्यांना समजेल अशा भाषेतील लिखानामुळे , विज्ञान समजण्यास सोपे जात असे.
डॉ. जयंत नारळीकर ( Dr.Jayant Naralikar ) यांचा जन्म 19 जुलै 1938 रोजी कोल्हापुर येथे झाला. वाराणसी येथून त्यांनी 1957 मध्ये बनारस विद्यापिठातून बी.एस्सी ची पदवी मिळवली होती. त्यानंतर त्यांनी केंब्रिज विद्यापिठातून गणिताची ट्रायपास परिक्षा उत्तिर्ण करून रँग्लरची पदवी आणि पीएच.डी.एस्सी पदव्या संपादन केल्या. पुढे त्यांनी मिळवलेला नावलौकिक, शास्रज्ञ म्हणून मिळवलेली ख्याती सर्वश्रूत आहे.
त्यांच्या कुटुंबियांनी सांगतिल्या प्रमाणे, डॉ. नारळीकर झोपेतच शांतपणे अनंतात विलिन झाले. त्यांना कोणताही दिर्घ आजार नव्हता. वयोमानानुसार प्रकृती काहीशी खालावली होती. त्यांच्या जाण्याने विज्ञान, साहित्या या क्षेत्राची न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.