Gaurav Express : आयआरसीटीसी आणि राज्य सरकारच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज सर्किट भारत गौरव ट्रेन सुरूवात झाली आहे. या ट्रेनचा प्रवास 9 जून 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुरू होत आहे. या ट्रेनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झेंडा दाखविणार आहेत.
मुंबई : 2025-06-08
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक वर्धापन दिनानिमित्त भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ लिमिटेड (आयआरसीटीसी) यांच्या संयुक्तविद्यमाने ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट भारत गौरव ट्रेन सुरू करण्यात आली आहे. या ट्रेनच्या प्रवाशांना 5 रात्री आणि 6 दिवस अशा प्रवासात महाराज्यांच्या जीवनातील ऐतिहासिक घडामोडी घडलेल्या पर्यटन स्थळांना भेट देण्याची संधी मिळणार आहे. या गौरव एक्सप्रेस ट्रेनला 100 टक्के बुकींग मिळाले आहे. उद्या म्हणजे सोमवारी दिनांक 9 जून 2024 रोजी सकाळी 6 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ट्रेनला सीएसएमटी फलाट क्रमांक 18 वरून हिरवा झेंडा दाखवून रवाना करणार आहेत.
पाच रात्री आणि सहा दिवसांच्या प्रवासाने जाणून घेता येणार शिवराय
या ट्रेनमधून सुरुवातीला 710 प्रवाशांनी बुकिंग केले आहे. त्यातील 480 प्रवासी इकॉनॉमी (स्लिपर) मध्ये 190 प्रवासी कम्फर्ट (3AC) मध्ये आणि 40 प्रवासी सुपिरियर (2AC) मधून प्रवास करणार आहेत. भारत गौरव ट्रेन टुरची योजना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 351 व्या राज्याभिषेक वर्धापन दिनानिमित्ताने सुरू केली आहे. या ट्रेनचा प्रवास पाच रात्री आणि सहा दिवस असा असणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी ही ट्रेन 9 जून 2025 रोजी रायगडाला पोहचणार आहे. महाराष्ट्र सरकार आणि भारतीय रेल्वेने संयुक्तपणे ही ट्रेन सुरू केली आहे. या ट्रेनद्वारे प्रवाशांना रायगड किल्ला, शिवनेरी किल्ला, प्रतापगड किल्ला, पन्हाळा किल्ला, लाल महाल, कसबा गणपती आणि शिवसृष्टी सारख्या एतिहासिक स्थळांना भेट देणार आहे. या सर्व स्थळांमध्ये भीमाशंकर आणि कोल्हापुरच्या महालक्ष्मी मंदीराचाही अतिरिक्त समावेश केला आहे.