ISRO Recruitment 2026 : ISRO URSC तर्फे ज्युनिअर रिसर्च फेलोशिप (JRF) च्या 17 जागांसाठी अर्ज मागवले आहेत. 11 जुलै 2026 पर्यंत पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
दिल्ली : 17-06-2026
देशातील अशा तरूण-तरूणींसाठी (ISRO Recruitment 2026) एक सुवर्णसंधी चालून आली आहे, ज्यांना अंतरिक्ष विज्ञानाच्या क्षेत्रात काम करण्याची इच्छा आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने (ISRO) ‘ज्युनियर रिसर्च फेलोशिप’ (JRF) साठी अर्ज मागवले आहेत. सायन्स आणि टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात रिसर्च कऱण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ही एक उत्तम संधी असणार आहे. ही फेलोशीप पात्र उमेदवारांसाठी आहे. इच्छूक उमेदवारांनी 11 जुलै 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करू शकतात.
ही फेलोशिप इस्रोच्या बंगळूर येथील ‘यू.आर.राव सॅटेलाईट सेंटर’ (URSC) द्वारे दिली जाणार आहे. हे केंद्र सॅटेलाईट तंत्रज्ञानाशी संबंधित अत्यंत महत्त्वाच्या कामांचे मुख्य केंद्र असून, येथे अंतराळ यानांची डिझायनिंग, निर्मिती, चाचणी आणि संचालन केले जाते. भविष्यातील अनेक अंतराळ मोहिमांचा भाग होण्याची संधी या फेलोशिपच्या माध्यमातून मिळणार आहे.
Table of Contents
वयोमर्यादा (ISRO Recruitment 2026)
इस्रोने जाहीर केलेल्या ‘URSC:02:2026’ या जाहीरातीनुसार :
उमेदवारांचे कमाल वय 28 वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयोमर्यादेत सुट दिली जाईल. यामध्ये SC/ST उमेदवारांना 5 वर्षे तर OBC उमेदवारांना 3 वर्षे शिथिलता दिली जाईल.
शैक्षणिक पात्रता (ISRO Recruitment 2026)
उमेदवारांकडे मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्र्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स, पीसीएम ( फिजिक्स, केमेस्ट्री, मॅथ्स ) मटेरिअल्स सायन्स किंवा या विषयांशी संबंधित विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन पदवी असणे आवश्यक आहे. शैक्षणिक रेकॉर्ड उत्तम असण्यासोबतच उमेदवाराने NET, GATE किंवा या दर्जाची कोणतीही राष्ट्रीय पातळीवरीर परीक्षा उत्तीर्ण केेलेली असणे अनिवार्य आहे.
दरमहा किती मानधन असणार ? (ISRO Recruitment 2026)
जेआरएफ (JRF) फेलोशिपचा सुरूवातीचा कालावधी 2 वर्षांचा असेल.कामगिरी उत्तम असल्यास किंवा गरजेनुसार हा काळ वाढवला जाऊ शकतो. ( JRF आणि SRF मिळून एकूण कालावधी 5 वर्षांपेक्षा जास्त असणार नाही )
स्टायपेंड : (ISRO Recruitment 2026)
ज्युनिअर रिसर्च फेलो (JRF) : दरमहा 37,000 रुपये स्टायपेंड दिला जाईल.
सिनियर रिसर्च फेलो (SRF) : प्रमोशन झाल्यानंतर दरमहा 42,000 रुपये दिले जाऊ शकतात.
निवड प्रक्रिया : शैक्षणिक पात्रता आणि अटी पूर्ण कऱणाऱ्यांना आधी शॉर्टलिस्ट केले जाईल आणि त्यानंतर इंटरव्ह्यू द्वारे अंतिम निवड केली जाईल.
अर्ज कसा करावा ? (ISRO Recruitment 2026)
- 1 सर्वात आधी अधिकृत संकेतस्थळ apps.ursc.gov.in वर जा.
- 2 होमपेजवर दिलेल्या ‘Recruitment’ या सेक्शनवर क्लिक करा.
- 3 त्यानंतर ‘JRF Fellowship’ वर क्लिक करून सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा.
- 4 तुमच्या पात्रतेनुसार JRF-E1, JRF-E2, JRF-E3 यांपैकी योग्य तो पर्याय निवडा.
- 5 लिंकवर क्लिक करून आपले नाव, ईमेल आयडी आणि इतर सर्व आवश्यक तपशील भरा.
- 6 तुमचा लेटेस्ट पासपोर्ट साईझ फोटो आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- 7 फॉर्म पूर्ण भरल्यानंतर तो सबमीट करा आणि भविष्यातील संदर्भातील प्रिंट आऊट (Print Out ) काढून स्वतःकडे सुरक्षित ठेवा.