Israeli Weapons : इस्राईलने हत्यारांच्या निर्यातीमध्ये आत्तापर्यंतचा रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. वर्ष 2024 मध्ये देशाचा रक्षा निर्यात व्यापार 14.8 अरब अमेरिकी डॉलर इतका उच्च पोहोचला आहे. यातील विशेष बाब ही आहे की, इस्राईल च्या प्रमुख ग्राहकांच्या यादीत कोणा कोणाचे नावं आहेत हे जाणून घेणे उत्सुकतेचे आहे.
इस्रायल : 2025-06-06
इस्रायल (Israeli Weapons ) ने 2024 मध्ये सैन्य निर्यातीतील आत्तापर्यंतचा सर्वात मोठा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. विशेष म्हणजे या देशाने हा रेकॉर्ड स्वतः युद्धात व्यस्त असताना केला आहे. नुकत्याच आलेल्या एका रिपोर्ट नुसार, इस्रायलने पहिल्या पेक्षा कितीतरी जास्त पटीने 2024 मध्ये हत्यारांची विक्री केली आहे. सध्या हा देश गाझा मध्ये मोठ्या प्रमाणावर युद्धात व्यस्त आहे. सिरिया, लेबनान, ईराण आणि यमन मध्येही तो हवाई हल्ले आणि इतर सैनिकी कारवायांमध्ये गुंतलेला आहे. जागतिक व्यासपिठावरून त्याला गाजाशी सुरू असणाऱ्या युद्धाला समाप्त करण्यासाठी मोठा दबाव आहे. मात्र इस्रायल कोणत्याही प्रकारची युद्धबंदी करण्यास राजी नाही. तो आपल्या विरोधकांना ताकदीने लढा देत आहे.
एका अहवालानुसार, इस्रायलच्या रक्षा मंत्रालयाने जाहिर केलेल्या ताज्या आकड्यांनुसार, 2024 मध्ये या देशाचा रक्षा निर्यांत स्तर उच्चांकी पोहोचला आहे. यावर्षात इस्रायलने 14.8 बिलियन अमेरिकी डॉलर चे सैन्य सामना, ( Israeli Weapons )हत्यारांची निर्यात केली आहे. 2023 च्या रेकॉर्डला त्यांनी तोडले आहे. यावर्षी त्यांनी 13 % नी वृद्धी केली आहे. ही प्रगती अशावेळी करण्यात आली आहे, जेव्हा हा देश स्वतः एका मोठ्या युद्धात गुंतलेला आहे.
आशिया देशांमधील मोठा भागिदार देश भारत
भारत हा इस्रायलसाठी आशियामधील सर्वात विश्वसनिय आणि प्रमुख रक्षा भागिदार म्हणून उदयास आला आहे. SIPRI च्या एका अहवालानुसार , 2020 ते 2024 च्या मधील कालखंडात भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे, ज्याने हत्यारे आयात केली आहेत. यातील भारताने इस्रायल कडून रक्षा हत्यारे 13 टक्के इतकी आयात केली आहेत. रशिया आणि फ्रान्स नंतर भारत हा इस्रायलचा सर्वात मोठा आयात कऱणारा देश आहे.
युरोप बनला सर्वात जास्त हत्यारे खरेदी करणारा प्रदेश
इस्रायल कडून सर्वात जास्त हत्यारे खरेदी करणारा प्रदेश म्हणून युरोप बनला आहे. जो 2024 मध्ये एकुण खरेदीच्या 54 टक्के इतका आहे. 2023 मध्ये हाच आकडा 35 टक्के इतका आहे. 2024 मध्ये युरोपीय देशांनी साधारण 8 अब्ज डॉलर च्या किंमतीचे इस्रायली हत्यारे खरेदी केली आहेत. 2023 मध्ये हीच खरेदी फक्त 4.6 अब्ज डॉलर इतकी होती. या वाढीचे सर्वात मोठे कारण रशिया-युक्रेन युद्ध हे आहे. ज्यासाठी युरोपीय देश आपल्या संरक्षण बजेट मध्ये वाढ करत आहेत.