Translate :

Sponsored

Iran War Impact,2026 : आखाती युद्धाचा परिणाम थेट औषधविश्वावर ! कच्चा माल, एपीआय आणि पॅकेजिंग, प्रिंटिंग शाईच्या दरात मोठी : Global Conflict Impact Pharama Industry Rising Raw Material Costs Medicine Prices Increase

आखाती युद्धाचा परिणाम थेट औषधविश्वावर ! कच्चा माल, एपीआय आणि पॅकेजिंग, प्रिंटिंग शाईच्या दरात मोठी.

Iran War Impact : औषध निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमतीत 30 ते 100 टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याने उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या वाढीचा परिणाम अद्याप किरकोळ बाजारातील औषधांच्या किंमतींवर पूर्णपणे झालेला नाही.

मुंबई : 27-03-2026 

जागतिक युद्धजन्य परिस्थितीचे परिणाम (Iran War Impact)  आता औषध उत्पादनावर दिसू लागले आहेत. कच्चा माल, एपीआय आणि पॅकेजिंग, प्रिंटिंग शाईच्या दरात मोठी वाढ झाल्याने गोळ्या तयार करणे महाग झाले असून, सध्या किंमती स्थिर असल्या तरी आगामी काळात वाढीची शक्यता व्यक्त केली जात आहे. औषध निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमतीत 30 ते 100 टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याने उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, या वाढीचा परिणाम अद्याप किरकोळ बाजारातील औषधांच्या किंमतीवर पूर्णपणे झालेला नाही. उद्योगातील उत्पादक, स्टॉकिस्ट आणि पुरवठादारांच्या मते, सध्या कंपन्या वाढलेला खर्च काही प्रमाणात स्वतः पेलत आहेत. ही स्थिती दिर्घकाळ टिकवणे कठीण असल्याते सांगत आहेत.

पॅरासिटोमोलसारख्या सर्वसामान्य औषधांच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा खर्च वाढला असून, डोलो, मेटासिन आणि कल्पोलसाऱख्या गोळ्यांच्या निर्मितीवरही त्याचा परिणाम जाणवत आहे. ॲसिडिटीवरील ओमेप्रोझोलसारख्या औषधांसाठी लागणाऱ्या घटकांच्या किंमतीही दुपटीकडे गेल्या आहेत. यापूर्वी सुमारे 350 रुपये खर्च येणाऱ्या घटकांसाठी आता जवळपास 650 रुपये मोजावे लागत आहेत.

पॅकेजिंग क्षेत्रातही मोठी वाढ नोंदवली जात आहे. पेट्रोकेमिकलवर आधारित साहित्य महागल्याने गोळ्यांच्या स्ट्रिपचा खर्च सुमारे 75 टक्क्यांनी वाढला आहे. तसेच औषधांवर छापण्यात येणाऱ्या शाईच्या किंमतीही दुपटीकडे गेल्या आहेत. या सर्व घडामोडींमुळे औषधांच्या उत्पादन खर्चावर ताण वाढला असून, पुढील काळात हा भार ग्राहकांवर टाकावा लागण्याची शक्यता औषध व्यावसायिक सांगत आहेत.

“कच्च्या मालाच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याने उत्पादन खर्च झपाट्याने वाढला आहे. सध्या कंपन्या हा भार सहन करत असल्या, तरी पुढे किंमती वाढवणे अपरिहार्य ठरू शकते. 30 ते  100 टक्क्यांपर्यंत कच्च्या मालाच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे उत्पादन खर्चावर मोठा ताण आला आहे.” अशी प्रतिक्रिया अर्जेंनिक्त हेल्थ केअर प्रा. लिं.सीईओ राजेश गुऱ्हानी यांनी दिली.

पॅरासिटोमोलची किंमत 235-255 वरून 350-500 पर्यंत वाढीच्या दिशेने  (Iran War Impact)

डोलो, मेटासिन, कल्पोलसारख्या गोळ्यांनाही फटका

ओमेप्राझोलसारख्या औषधांच्या कच्च्या मालाचा किंमतीत मोठी वाढ

औषधांच्या स्ट्रिप आणि प्रिंटींग शाईचा खर्चही दुपटीकडे

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored