Translate :

Sponsored

IPL 2025 Revised Schedule Announced : आयपीएल चे नवीन वेळापत्रक जाहीर, अंतिम सामना रंगणार 3 जूनला

संपूर्ण देशभरात आयपीएल सामन्यांचा खुसामदार माहौल रंगलेला होता. मात्र देशातील पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्याच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचे सामने तात्तपुरते स्थगित करण्यात आले होते. आता युद्धाचे वातावरण निवळल्यामुळे आयपीएलचे सामने पुन्हा रंगणार आहेत.

क्रिडा : 2025-05-12

आयपीएल 2025 (IPL 2025 ) च्या हंगामातील सामने अचानक स्थगित करण्यात आले होते. सामने रंगात आलेले असताना या हंगामातील 58 वा सामना थांबवण्यात आला होता. त्यानंतर ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आल्याचे घोषीत केले होते. मात्र रविवार 11 मे पासून भारत पाक युद्धपरिस्थिती आटोक्यात आल्याचे निष्पन्न झाल्याने आयपीएल 2025 चा हंगाम पुन्हा सुरू करण्याचे घोषित करण्यात आले आहे. 17 मे पासून या स्पर्धेला सुरूवात होणार आहे. तसे नवे वेळापत्रक जाहिर करण्यात आले आहे.  3 जून ला या स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. 

उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक असे असणार आहे 

  • 17 मे, शनिवार, सायंकाळ 7:30 वाजता -रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स, बंगळूरू
  • 18 मे, रविवार, दुपारी 3:30 वाजता – राजस्थान रॉयल्स विरूद्ध पंजाब किंग्ज, जयपूर
  • 18 मे, रविवार, सायंकाळी 7:30 वाजता – दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध गुजरात टायटन्स, दिल्ली
  • 19 मे, सोमवार, सायंकाळी 7:30 वाजता -लखनौ सुपर जायंटस विरूद्ध सनरायझर्स हैद्राबाद, लखनौ
  • 20 मे, मंगळवार, सायंकाळी 7:30 वाजता -चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध राजस्थान रॉयल्स, दिल्ली
  • 21 मे, बुधवार, सायंकाळी 7:30 वाजता – मुंबई इंडियन्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स, मुंबई
  • 22 मे, गुरुवार, सायंकाळी 7:30 वाजता – गुजरात टायटन्स विरूद्ध लखनऊ सुपर जायंटस्, अहमदाबाद
  • 23 मे, शुक्रवार, सायंकाळी 7:30 वाजता – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद, बंगळूरू
  • 24 मे, शनिवार, सायंकाळी 7:30 वाजता – पंजाब किंग्ज विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स, जयपुर
  • 25 मे , रविवार, दुपारी 3:30. वाजता – गुजरात टायटन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज,अहमदाबाद
  • 25 मे, रविरार, सायंकाळी 7:30 वाजता – सनरायझर्स हैद्राबाद विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली
  • 26 मे, सोमवार, सायंकाळी 7:30 वाजता – पंजाब किंग्ज विरूद्ध मुंबई इंडियन्स, जयपूर
  • 27 मे, मंगळवार, सायंकाळी 7:30 वाजता – लखनौ सुपर जायंटस् विरूद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू, लखनौ
  • 29 मे, गुरूवारस संध्याकाळी 7:30 वाजता – पात्रता सामना 1
  • 30 मे, शुक्रवार, संध्याकाळी 7:30 वाजता – एलिमिनेटर
  • 01 जून, रविवार, संध्याकाळी 7:30 वाजता- पात्रता 2
  • 03 जून, मंगळवार, संध्याकाळी 7:30 वाजता – अंतिम सामना

आयपीएलने एका पत्रकाद्वारे जाहीर केले आहे की, बीसीसीआयला टाटा आयपीएल 2025 पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचा आनंद होत आहे. एकुण 17 सामने 6 ठिकाणी खेळवले जातील. 17 मे पासून हे स्थगित केेलेले सामने सुरू होतील, आणि 3 जूनला अंतिम सामना असणार आहे. नविन वेळापत्रकात दोन डबल हेडर सामने असणार आहेत. यावेळी दोन सामने रविवारी खेळवले जातील. प्लेऑफचे खालीलप्रमाण असणार आहेत.

  1. क्वालिफायर  1 -29 मे
  2. एलिमिनेटर – 30 मे
  3. क्वालिफायर – 2 – 1 जून
  4. अंतिम सामना – 3 जून
  5. अंतिम सामना – 3 जून

पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात पुन्हा रंगणार सामना –

आयपीएल 2025 स्पर्धेतील 58 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात सुरू होता. मात्र हा सामना अर्धवट स्थगित करण्यात आला होता. पण आता 17 समाने होणार असल्याने हा सामना परत होणार आहे. हा सामना 24 मे ला जयपुर येथे होईल.

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored