International Yoga Day 2025: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशाखापट्टणमध्ये 11 वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला. या दरम्यान, त्यांनी जगाला एक संदेश दिला की योग प्रत्येकाचा आहे आणि प्रत्येकासाठी आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की योगाने संपूर्ण जग जोडले आहे.
विशाखापट्टणम : 2025-06-21
जगभरात अशांतता वाढली आहे. यावेळी योगची सर्वात जास्त गरज आहे. योगातून शांती मिळते. योग तणावातून समाधानाकडे घेऊन जातो. योग सर्वांचां आणि सर्वांसाठी आहे. योगाला एक जनआंदोलन बनवू या. हे आंदोलन जगाला शांती, आरोग्य आणि समरसतेकडे घेऊन जाईल. या आंदोलनात प्रत्येक व्यक्ती दिवसाची सुरूवात योगाने करेल. या आंदोलनात सर्व समाज योगामुळे एकत्र येईल. योग मानवतेला एका सुत्रात आणेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनी म्हटले आहे.
योग जीवनशैलीचा भाग
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘योग म्हणजे सामील होणे आणि योगाने संपूर्ण जगाला एकत्र जोडले आहे. योग सर्वांचा आहे आणि योग प्रत्येकासाठी आहे. हा योग आज सर्व लोकांच्या जीवनाचा एक भाग बनला आहे. यावर्षीचा हा 11 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. यावर्षीही संपूर्ण जग 21 जून रोजी एकत्र योग करत आहे.
योग प्रत्येकासाठी, योग सर्वांचा आहे: पंतप्रधान मोदी
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, ‘जेव्हा मी गेल्या दशकात योगाचा प्रवास पाहतो, तेव्हा मला अनेक गोष्टी आठवतात. 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून ओळखले जावे असा प्रस्ताव भारताने संयुक्त राष्ट्रांच्या सभेत मांडला आणि जगातील 173 देशांनी आमच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला. आजच्या जगात, अशी एकता, असे समर्थन मिळणे ही सामान्य घटना नाही. हे केवळ एका प्रस्तावाचे समर्थन नव्हते, तर मानवतेच्या हितासाठी जगाचा हा सामूहिक प्रयत्न होता. आता 11 वर्षांनंतर आपण पहातो की योग जगभरातील लाखो लोकांच्या जीवनशैलीचा एक भाग बनला आहे.
पंतप्रधान मोदी यांच्यासमवेत चंद्रबाबू नायडू आणि पवन कल्याण उपस्थित होते
आज 11 वा आंतरराष्ट्रीय योग दिन एका अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने विशाखापट्टनममधील समुद्रकिनारी तब्बल पाच लाख सहभागींसोबत योग साधना केली. कॉमन योगा प्रोटोकॉल (CYP) सत्रात सहभागी झाले होते. त्यांनी राष्ट्राली सामंजस्यपूर्ण योग सादरीकरणाच्या माध्यमातून नेतृत्व दिलं. देशभरात 3.5 लाखांहून अधिक ठिकाणी एकाच वेळी योग सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याणही पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर मंचावर उपस्थित होते. योगाच्या दिवशी योगाची थीम ‘एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग’ आहे. हा कार्यक्रम देशभरात 1 लाखाहून अधिक ठिकाणी आयोजित केलेल्या योग संगमशी संबंधित असेल. त्यात 2 कोटी पेक्षा जास्त लोकांनी त्यात भाग घेतला.
यावर्षी ‘एक पृथ्वी, एक आरोग्य’ ही थीम मानव आणि निसर्गाच्या आरोग्य नात्याला अधोरेखित करते आहे. ‘भारताच्या सर्वे सन्तु निरामया:’ या तत्वज्ञानाच्या जागतिक प्रसार योग दिनाच्या निमित्ताने अधिक व्यापक होत आहे. यासोबतच MyGoV आणि MYBharat सारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर योगा विथ फॅमिली आणि योगा अनप्लग्ड यांसारख्या उपक्रमांतून तरूणांना आणि कुटुंबांना जोडले जात आहे. पंतप्रधान मोदींनी याआधीही नवी दिल्ली, चंदीगड, लखनऊ, मैसूर, श्रीनगर आणि संयुक्त राष्ट्र मुख्यालय येथे योग दिन कार्यक्रमांचे नेतृत्व केले आहे.