Table of Contents
जागतिक निरोगी मन – शरीर दिवस ( International Mind Body wellness Day ) – ३ जानेवारी २०२५, महत्त्व आणि उपाययोजना !
माणसाला आयुष्याचा आनंद घ्यायचा असेल तर काय हवं असतं ? याचं उत्तर कोणी पैसा, कोणी करीयर, कोणी फिरणं तर कोणी चांगले कपडे, खाणं असं देतील. प्रत्येकाची आनंदीची व्याख्या वेगळी असू शकते. मात्र याचं खरं उत्तर आहे माणसाला आयुष्याचा खरा आनंद घ्यायचा असेल तर त्याच्याकडे निरोगी मन आणि शरीर असायला हवं. तरच तो खऱ्या अर्थाने आयुष्य भरभरून जगू शकतो.
अशा या निरोगी मन आणि शरीराचे महत्त्व पटावे यासाठी दरवरषी जानेवारी महिन्याच्या ३ तारखेला जागतिक निरोगी मन, शरीर दिन ( International Mind Body wellness Day ) साजरा केला जातो. आजच्या लेखात आपण या दिवसाचे महत्त्व, निरोगी मन-शरीरासाठीच्या उपाययोजना असं सर्वकाही जाणून घेणार आहोत.
जगभरात ३ जानेवारी या दिवशी निरोगी मन आणि शरीर दिवस साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश आहे की, आपल्या शरीर आणि मनाचे महत्त्व समजून आपण त्याची योग्य काळजी कशी घ्यावी याची जनजागृती व्हावी.
का साजरा केला जातो ? निरोगी मन शरीर हा दिवस
आपले शरीर आणि मन दोन्ही जेव्हा व्यवस्थित काम करत असते तेव्हा बऱ्याचदा त्यांची विशेष काळजी घेण्याची आपल्याला गरज वाटत नाही. जोपर्यंत ते नीट काम करत असतात तेव्हा त्यासाठी प्रत्येक जण योग्य व्यायाम, ध्यान धारणा अशा काही गोष्टी करतातच असे नाही. मात्र जेव्हा त्यात काही बिघाड होतो, तेव्हाच आपल्याला त्यांचे महत्त्व समजते. म्हणूनच शरीर आणि मनात काही बिघाड झाल्यावरच नाही तर ते योग्य स्थितीत असतानाच त्याची योग्य काळजी घेत, आपल्या शरीरावर प्रेम करत, त्याचे लाड करत आरोग्य कसे जपावे हे सांगण्यासाठी ३ जानेवारीला जागतिक निरोगी मन-शरीर दिवस ( International Mind Body wellness Day ) साजरा केला जातो.
आजच्या धकाधकीच्या, ताणतणावाच्या जीवनशैलीमध्ये थोडा विशष वेळ काढून आपल्या मन आणि शरीरावर प्रेम करण्याची वेळ आलेली आहे. स्वतःची काळजी घेत आपले मन, शरीर आणि आत्मा यांच्यात योग्य मेळ घालण्यासाठी अशा काळजीची प्रत्येकालाच गरज आहे. हे या दिवसाचे उद्दीष्ट आहे.
निरोगी मन-शरीर दिवस ही संकल्पना काय आहे ?
हा दिवस ( International Mind Body wellness Day ) साजरा करणे हे एक आरोग्य धोरण आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीच्या माध्यमातून मन आणि शरीर एकमेकांशी कसे परस्परसंवाद साधतात यावर लक्ष क्रेंदीत केले जाते. याव्यतरिक्त शरीराच्या तंदुररूस्तीला महत्त्व देऊन आपतकालीन वैद्यकीय परिस्थीती टाळण्यासाठी निरोगी मन-शरीर ही संकल्पना राबवली जाते.
मानवाच्या विचार, भावना आणि वर्तणूक यांचा परिणाम त्याच्या शरीरावर होत असतो. मन आणि शरीर यांचा संबंध आहे याच्यावर आज भरपूर संशोधन झाले आहे. मानसिक विकारांमुळे अनेक शारीरीक व्याधींचा सामना करावा लागत असतो. जर मन निरोगी असेल तर मानवाचे शरीरसुद्धा निरोगी रहाण्यास मदत होते हे आता सिद्ध झालेले आहे.
जागतिक निरोगी मन-शरीर दिवसाचे महत्त्व – ( International Mind Body wellness Day )
निरोगी आरोग्यासाठी निरोगी मन आणि शरीरीचे महत्त्व खुप आहे. निरोगी मन आणि शरीराचे अनेक फायदे आहेत. ताणतणाव कमी होतो, आपले भावनिक, शारीरीरक आरोग्य चांगले रहाते. म्हणूनच हा दिवस साजरा करण्याचे महत्त्व आहे. पुढील काही मुद्दे त्यासाठी महत्त्वाचे आहे.
- आपले मन आणि शरीर दोन्ही ताणतणाव सहन करत असतात. तुम्ही हा ताण चांगल्या पद्धतीने हाताळू शकता. त्यासाठी निरोगी मन शरीर या संकल्पनेचा अवलंब आपल्या आयुष्यात करायला हवा.
- निरोगी मन शरीर ( International Mind Body wellness Day ) ही संकल्पना वापरून तुम्ही तुमचे मन कायम प्रसन्न ठेवू शकता. तुमची भीती, ताण तुम्ही कमी करू शकता. आयुष्यात येणाऱ्या कठीण प्रसंगांना तुम्ही धीराने सामोरे जाऊ शकता, जर निरोगी मन-शरीर या संकल्पनेला तुम्ही स्विकारले असेल तर.
- निरोगी मन-शरीर ही संकल्पना राबवल्याने तुमचे वजन आटोक्यात रहाते, तुम्हाला झोप चांगली लागते आणि दिर्घकालीन आजारांपासून तुम्ही लांब रहाता.
जागतिक निरोगी मन-शरीर दिवस कसा साजरा कराल ? ( International Mind Body wellness Day )
हा दिवस साजरा करून तुम्ही रोजच्या आयुष्यात काही चांगल्या सवयी लावू शकता.
- योग शिकणे – योग हे निरोगी आरोग्याचा कानमंत्र आहे. योग शिकल्याने तुमचे मन आणि शरीर दोन्ही निरोगी रहाण्यास मदत होते. प्राणायाम आणि योग शिकल्याने मन आणि शरीर निरोगी रहाण्यास निश्चीतच मदत होते.
- भरपूर पाणी पीण्यास सुरूवात करा. शरीरात योग्य प्रमाणात पाणी असल्यास अनेक आजार दूर रहातात.
- योग्य प्रमाणात झोप घ्या. योग्य प्रमाणातील झोप ही निरोगी शरीर आणि मनासाठीची आवश्यक बाब आहे.
- सकाळी लवकर उठणे – सकाळी लवकर उठून व्यायाम, प्राणायाम आणि ध्यानधारणा केल्यास निरोगी मन शरीर लाभण्यास मदत होते.
- मोबाईल आणि सोशलमीडीयाचा योग्य प्रमाणात वापर करून आपले मन आणि शरीर निरोगी राखण्यास मदत करा.
- योग्य आहार घ्या. नेहमी आरोग्यला हितकर असाच आहार घ्या.
- तुमच्या मानसिक आणि शारीरीक अडचणींसाठी योग्य वैद्यकीय मदत घ्या.
- स्वतःसाठी वेळ काढा. तुमचे छंद जोपासा. भरपूर भटकंती करा.
- जर तुम्ही खुप काम करत असाल तर त्याचे ठराविक तास ठरवा. काम कधी सुरू करायचे आणि ते कधी संपवायचे याचे योग्य नियोजन करा.
- तुमच्या शरीराला योग्य सवयींचे वळण लावा.
- चांगल्या मित्र-मैत्रिणी, परीवाराच्या सहवासात रहा.
अशा काही सवयी लावून तुम्ही निरोगी मन-शरीर कमावू शकता. जगातील प्रत्येकाला चांगले निरोगी आयुष्य जगण्यासाठी प्रेरणा मिळावी या उद्देशाने हा दिवस ( International Mind Body wellness Day ) साजरा केला जातो. वर्षाच्या सुरुवातीलाच हा दिवस साजरा करून वर्षभर तुम्ही निरोगी मन-शरीराची जपणूक करावी हाच याचा उद्देश आहे. तुम्हाला सगळ्यांना जागतिक निरोगी मन-शरीर दिवसाच्या खुप शुभेच्छा.
-ज्योती भालेराव.
This post was last modified on January 3, 2025 1:02 am
View Comments (1)
"This post has helped me solve my issue, thanks a ton!"