Translate :

Sponsored

Indurikar Maharaj, Shocking Statement : ” मला घोडे लावा, माझ्या मुलीचा काय दोष, तिच्या कपड्यावर कशाला बोलता ? ट्रोलिंगने हैराण इंदुरीकर महाराज वैतागले

मुलीच्या साखरपुड्यावर झालेल्या ट्रोलींगला कंटाळून इंदुरीकर सोडणार किर्तनाचा व्यवसाय

Indurikar Maharaj : महाराष्ट्रातील प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा नुकताच साखरपुडा धुमधडाक्यात पार पडला. या साखरपुड्यात तिने घातलेल्या कपड्यांपासून, करण्यात आलेल्या खर्चापर्यंत सगळ्यावर लोकांनी टीका केली होती. यावरून आता इंदुरीकर महाराज काय म्हणाले ? हे जाणून घ्या.

अहिल्यानगर : 13/11/2025

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj ) यांच्या मुलीचा साखरपुडा काही दिवसांपूर्वी मोठ्या थाटामाटात पार पडला होता. त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यात झालेल्या खर्चावर, तिच्या कपड्यांवर आता लोकांनी टिका करण्यास सुरूवात केली आहे. कारण आजपर्यंत इंदुरीकर महाराजांनी आपल्या किर्तनातून समाजाला जो संदेश दिला त्यांच्या विरूद्ध त्यांचे वागणे वाटत असल्याने त्यांच्यावर टिका होत आहे.

दुसऱ्यांना साधेपणाने लग्न करण्याचे उपदेश देणारे महाराज आपल्या मुलीचा साखरपुडा सोहळा मात्र चांगला मोठा साजरा करताता असे म्हणत त्यांच्यावरती सोशल मीडियातून व्यक्तीगत टीका झाल्या, या टिकेमुळे इंदुरीकर महाराजांना मोठा धक्का बसला आहे. परिणामी त्यांनी त्यांच्या एका किर्तनामध्ये याबाबतची खंत व्यक्त करत थेट किर्तन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हयरल झाला आहे. (Indurikar Maharaj)

काय म्हणाले आहेत इंदुरीकर महाराज ?  ( Indurikar Maharaj )

” आम्ही किती कष्ट केली लोक याचा विचार करत नाहीत, आम्ही आमचा संसार किती कष्टातून मोठा केला याचा विचार लोक करत नाहीत. आमची पोरं लहान असताना आठ-आठ दिवस माझी त्यांच्याशी गाठ नव्हती. आणि आता लोकं इतके खाली गेले आहेत, की माझ्या मुलीच्या अंगात कपडे कसे आहेत, यावरून लोकांचे कमेंटस आहेत. याच्यापेक्षा वाईट काय असेल ? आता चार दिवसांपासून माझ्या मुलीच्या अंगातील कपड्यावर लोकांनी बातम्या तयार केल्या आहेत.

पण तिच्या बापाला… मला तुम्ही घोडे लावा… माझा पिंड गेलाय.. माझ्या मुलाचा आणि मुलीचा यात काय दोष आहे. पण या कॅमेऱ्यावाल्यांनी आठ दिवसांत माझं जगणं मुश्किल करून टाकलंय. काय.. मला एक सांगा… मुलगी तुम्हालाही आहे. तुमच्या मुलीच्या साखरपुड्यात कपडे नवरदेवाकडेच घेतात की मुलीकडचे घेतात ? मग कपडे त्यांनी आणले असतील की म्या घेतले असतील ? एवढी तरी क्लिप टाकणार्यांना लाज पाहिजे ना. माणूस नालायक असावा पण किती ?

पुढे महाराज म्हणतात, ” त्याच्यामुळे आता मी कंटाळले महाराज. जवळजवळ मी दोन तीन दिवसात टाकणार आहे एक क्लिप. थांबून घेणार आहे आता…बास झाली 31 वर्ष… लोकांच्या शिव्या खाऊन आयुष्यात सगळं चांगलंच केलं, आयुष्यात चांगलच त्यांचे फळ .. माझ्यापर्यंत ठिक होतं, माझ्या घरादारापर्यंत जायला नको होतं. मी आजही समर्थ आहे ना उत्तर द्यायला. मला अजून दोन वर्ष आयुष्य आहे. मी अजून आहे ना.. पण कुटुंबापर्यंत गेल्यावर त्याच्यात मजा नाही.

ही अक्कल इंदुरीकरलाच आली पाहिजे. त्याने किर्तन बंदच केली पाहिजेत. खरंय की खोटयं ? तुम्ही काहीच बोलत नाही.. हे त्याने बंद केलं पाहिजे… त्याला लाज वाटली पाहिजे, की आता कमेंट करणारे लोकं बोलायला लागले. आता इंदुरीकरने फेटा ठेवून द्यावा. त्याचं त्याने चांगलं जगावं. आम्ही दोन तीन दिवसांपासून विचार करतोय. दोन तीन दिवसात मी घेणारे निर्णय पण मजा नाही राहिली त्याच्यात आत. ”

कोण आहे इंदुरीकर महाराजांचा जावई  ( Indurikar Maharaj )

साहिल चिलाप हे मुंबईतील नामांकित बांधकमा व्यावसायिक आहेत. ते मुळचे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील असून, उच्च शिक्षित आहेत. गावाकडे त्यांची मोठी बागायती शेती आहे. आणि शहरात त्यांनी स्वतःचा यशस्वी व्यवसाय उभा केला आहे. इंदुरीकर महाराज्यांच्या या साखरपुड्याच्या कार्यक्रमामुळे पुन्हा एकदा त्यांच्या कुटुंबावर चाहत्यांच्या लक्ष केंद्रीत झालं आहे. महाराजांच्या शिकवणीप्रमाणेच त्यांच्या आयुष्यातील आनंदाचे क्षणही लोकांना प्रेरणा देणारे ठरत आहेत.

इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा साखरपुडा पार पडला थाटामाटात  ( Indurikar Maharaj )

इंदुरीकर महाराजांची कन्या ज्ञानेश्वरी देशमुख आणि साहिल चिलाप यांचा साखरपुडा नुकताच पार पडला. या सोहळ्याचं आयोजन संगमनेरमध्ये करण्यात आलं होतं. राजेशाही थाटात मुलीची आणि जावयाची रथावरून राजेशाही मिरवणूक, पाहुण्यांच्या उपस्थितीने गच्च भरलेलं कार्यालय, वारकरी वेशात टाळकरी, बायकांनी धरलेला फेर चर्चेचा विषय ठरला. या कार्यक्रमाचे व्हिडियो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या समारंभाला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावून शुभेच्छा दिल्या.

 

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored