Translate :

Sponsored

Indrayani River Bridge Collapse Maval Dead Mla Sunil Shelke Statement : इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; 20-25 जण वाहून गेल्याची शक्यता; 6 जणांचा मृत्यू.

Indrayani River Accident : इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला आहे. काहीजण वाहून गेले तर 6 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. 

पुणे : 2025-06-15

पुण्याच्या मावळ तालुक्यातील कुंडमळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची घटना समोर आली आहे (Indrayani River Accident ). आमदार सुनिल शेळके यांनी देलेल्या माहितीनुसार या दुर्दैवी घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच या घटनेत तब्बल 20 ते 25 जण वाहून गेले असल्याचीही माहिती समोर आली आहे. वाहून गेलेल्या नागरिक पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य हे युद्धपातळीवर सुरू झालं आहे. 

आमदार सुनील शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज रविवार असल्याने मावळ तालुक्यातील कुंडमळा या ठिकाणी पर्यंटकांनी गर्दी केली होती. पावसाळा असल्याने या ठिकाणी रोज अनेक पर्यटक भेट देतात. कुंडमळा ओलांडण्यासाठी येथील इंद्रायणी नदीवर (Indrayani River ) एक पूल बांधलेला आहे. एकाचवेळी क्षमतेपेक्षा जास्त लोक या पुलावर उभे राहिल्याने हा पूल कोसळला असल्याची प्राथमिक माहिती आहे. या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 20-25 लोक वाहून गेले आहे. 

 

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored