Indigo Flights Issues : गेल्या आठवडभरा इंडिगो विमान कंपनीची उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहे. रविवारीही इंडिगोच्या 350 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली. यामध्ये दिल्ली, चेन्नई, जयपूर, हैद्राबाद, भोपाळ, मुंबई आणि त्रिची येथून निघणाऱ्या विमानांचा समावेश आहे.
दिल्ली : 07/12/2025
इंडिगोच्या उड्डाणांचा विलंब आणि घोळ सध्या सुरूच आहे. या सगळ्या गोंधळामध्ये सलग सहाव्या दिवशी भरच पडली आहे. रविवारी (7 डिसेंबर) दिल्ली विमानतळावर इंडिगोची अनेक उड्डाणे रद्द झाल्याने प्रवाशांच्या अडचणीत वाढ झाली. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर लांब रांगा लागल्या होत्या. उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांना तासनतास वाट पहावी लागली. एएनआय वृत्तसंस्थेनुसार, दिल्ली विमानतळावरील उड्डाण माहिती स्क्रीनवर इंडिगोची अनेक उड्डाणे रद्द झाल्याचे वृत्त दिले आहे.
यात भर म्हणून चेन्नई विमानतळावरही 30 हून अधिक उड्डाणे रद्द कऱण्यात आली. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरही इंडिगोच्या अनेक प्रवाशांना उड्डाणे रद्द कऱण्यात आली. विलंबाचा सामना करावा लागला. गेल्या पाच दिवसांत इंडिगोच्या 2000 हून अधिक उड्डाणे रद्द कऱण्यात आली. ज्यामुळे दिल्ली, बंगळूर आणि हैद्राबाद सारख्या प्रमुख केंद्रावरही त्याचा परिणाम झाल्याचे पहायला मिळाले.
शनिवारी 800 विमान उड्डाणे रद्द (Indigo Flights Issues)
इंडिगोने शनिवारी एक निवेदन जारी करत, 800 हून अधिक उड्डाणे रद्द केली. तर शुक्रवारी 1,000 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली होती. विमान कंपन्यांच्या नेटवर्कमध्ये सतत वाढत असलेल्या गोंधळामुळे प्रवाशांची परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.
केंद्र सरकारकडून विमानांच्या तिकिटांवर लगाम (Indigo Flights Issues)
या संकटादरम्यान, सरकारने विमान भाडे निंयत्रित करण्याचा आदेश जारी केला. नागरी उड्डाणे मंत्रायलायच्या म्हणण्यानुसार, 500 किलोमीटरपर्यंत विमानांसाठी कमाल भाडे 7,500,500 ls 1,000 किलोमीटरच्या विमानांसाठी 12,000, 1,ooo ते 1,500 किलोमीटरच्या विमानांसाठी 15, 000 आणि 1,500 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या विमानांसाठी 18,000 असे निश्चित करण्यात आले आहे. हे नियम बिझनेस क्लास आणि उडान योजनेच्या विमानांना लागू होणार नाहीत.
गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या इंडिगो संकटामुळे शनिवार 800 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली. त्यानंतर आज 6 व्या दिवशीही इंडिोगोच्या सहाव्या दिवशीही सुरू आहे. तथापि, इंडिओने त्यांच्या 95 टक्के उड्डाणे सामान्य केल्याचा दावा केला आहे.
138 पैकी 135 ठिकाणी विमानसेवा सुरू असल्याचे एअरलाईनने सांगितले. सध्या इंडिगो कंपनीविषयीची प्रवाशांच्या मनातील विश्वासार्हता कमी झाली आहे. ती परत पूर्ववत होण्यासाठी किती दिवस लागणार हे निश्चित नाही.