Translate :

Sponsored

Indigo Crisis, Good News : इंडिगो देणार प्रवाशांना तिकिटांचा परतावा; रद्द झालेल्या हजारो उड्डाणांची होणार भरपाई, प्रवाशांना दिलासा ! : Indigo Flight Cancelled Passengers Will Get Refunds For Indigo Tickets

इंडिगो देणार प्रवाशांना तिकिटांचा परतावा; रद्द झालेल्या हजारो उड्डाणांची होणार भरपाई, प्रवाशांना दिलासा !

Indigo Crisis : सध्या देशात इंडिगो विमान कंपनीच्या सेवेने सर्वत्र संभ्रमाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत 6 डिसेंबरला केंद्र सरकारने इंडिगो एअरलाईन्सवर कडक कारवाई करत कंपनीला प्रवाशांचा परतावा करण्याचे निर्देश दिले आहेत. कधीपर्यंत हा परतावा दिला जाणार आहे, ते जाणून घ्या.

दिल्ली : 07/12/2025

गेल्या आठवडाभरात इंडिगोच्या विमान सेवा विस्कळित (Indigo Crisis) झाल्याने प्रवाशांचे खुप हाल झाले. हजारो प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. यासर्व गदारोळात प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. विमान वाहतूक मंत्रालयाने इंडिगोला शनिवारी संध्याकाळपर्यंत रद्द केलेल्या विमानांच्या तिकिटांचे पैसे परतफेडीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहे.

म्हणजेच प्रवाशांना 7 डिसेंबरपर्यंत तिकिटांचे पैसे परत मिळणार आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने इंडिगोला सोमवारी रात्री 8 वाजेपर्यंत विमानातील व्यत्ययांमुळे प्रभावित झालेल्या प्रवाशांसाठी तिकिट परतफेड प्रक्रिया पूर्ण कऱण्यास सांगितले आहे. तसेच विमान कंपनीने उड्डाण रद्द झाल्यामुळे राहिलेल्या सर्व सामान पुढील 48 तासांच्या आत पोहोचवले जाईल याची खात्री करावी असेही म्हटले आहे.

काय आहे इंडिगो विमानांचा घोळ  (Indigo Crisis )

5 डिसेंबरला देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोच्या 1,000 हून अधिक उड्डाणे रद्द कऱण्यात आली. त्यानंतर शनिवारी 6 डिसेंबरला ही हीच परिस्थिती कायम राहिली. शनिवारी, देशातील चार प्रमुख विमानतळांसह दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि बंगळूर येथील अनेक शहरांमधील विमानतळांवर 400 हून अधिक उड्डाणे रद्द कऱण्यात आली होती. परताव्याच्या प्रक्रियेत कोणताही विलंब किंवा पालन न केल्यास तात्काळ नियामक कारवाई केली जाईल, असे मंत्रालयाने म्हटले आहे.

इंडिगोचे धोरण काय ? ( Indigo Crisis )

इंडिगोच्या अधिकृत धोरणानुसार, जर उड्डाण रद्द झाले, प्रस्थान वेळ एक तास किंवा त्यापेक्षा जास्त पुढे ढकलली गेली किंवा दोन तासांपेक्षा जास्त उशीर झाला, तर प्रवाशांना मोफत तारीख वेळ बदलता येईल, किंवा पूर्ण पैसे परत मिळतील. ‘प्लॅन बी’ हा ऑनलाईन पर्याय वापरून प्रवासी स्वतः दुसरे उड्डाणे निवडू शकतात किंवा परतफेड प्रक्रिया करू शकतात. ट्रॅव्हल एजंटकडून बुकिंग केले असेल व त्या एजंटशी संपर्क साधावा लागतो. डीजीसीएच नियमानुसार,जर विमान कंपनीने प्रस्थानचे किमान दोन आठवड्यांआधी उड्डाण रद्द झाल्या पूर्वसूचाना दिली नाही किंवा कनेक्ट फ्लाईट चुकली, तर प्रवाशांना भरपाई मिळण्याचा अधिकार आहे.

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored