Indian Women Cricket Team : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरूवारी राष्ट्रपती भवनात आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक विेजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाची भेट घेतली. संघाकडून सर्व खेळाडूंची स्वाक्षरी असलेले संघ जर्सी भेट देण्यात आली.
दिल्ली : 07/11/2025
2 नोव्होंबर रोजी भारतीय महिला संघाने विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण सामन्यात दक्षिण अफ्रिकेला 52 धावांनी पराभूत करत इतिहास रचला आहे. भारताने आपले पहिले जेतेपद पटकावले. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारताने इतिहास घडवला आहे. त्यामुळे आता भारतीय संघावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे. भारतीय संघ पंतप्रधान मोदी यांना देखील भेटला आहे. अशातच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरूवारी राष्ट्रपती भवनात आयसीसीस महिला एकदिवसीय विश्वविजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाची भेट घेतली. जिथे कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी त्यांना सर्व खेळाडूंच्या स्वाक्षरी असलेले संघ जर्सी भेट दिली. विश्वचषक अंतिम सामन्यात दक्षिण अफ्रिकेचा पराभव करून भारताने महिला क्रिकेटमधील पहिले जागतिक विजेतेपद जिंकून इतिहास रचला आहे.
राष्ट्रपतींकडून खेळाडू महिलांचे कौतुक – (Indian Women Cricket Team)
राष्ट्रपती मुर्मू यांनी संघाचे त्यांच्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल अभिनंदर केले आणि सांगितले की, खेळाडूंनी केवळ इतिहास रचला नाही तर तरूण पिढीसाठी आदर्श देखील बनल्या आहेत. राष्ट्रपती कार्यालयातून जारी केलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, ही कामगिरी तरूण पिढीला, विशेषतः मुलींना जीवनात पुढे जाण्यासाठी प्रेरणा देईल. मुर्मू यांंनी विश्वास व्यक्त केला की, संघ भविष्यातही भारतीय क्रिकेटला जहात सर्वोच्च स्थानावर नेत राहील आणि खेळाडूंना त्यांच्या क्रिकेट प्रवासात येणाऱ्या अडचणींबद्दल ते म्हणाले, कधीकधी खेळाडूंची झोपही उडून गेली असेल. पण त्यांनी सर्व आव्हानांना तोंड दिले. न्यूझीलंडवरील विजयानंतर लोकांना विश्वास होता की सामन्यातील चढ-उतार असूनही, आपल्या मुली जिंकतील.
खेळाडूंचे यश त्यांच्या कठोर मेहनतीमुळे – (Indian Women Cricket Team)
मुर्मू म्हणाल्या की, खेळाडूंचे यश त्यांच्या कठोर परिश्रम, कौशल्य, दृढनिश्चय आणि त्यांच्या कुटुंबियांचे आणि क्रिकेट चाहत्यांचे प्रेम आणि आशिर्वाद यामुळे आहे. राष्ट्रपतींनी संघातील प्रत्येक सदस्याचे अभिनंदन केले. भारत आणि परदेशातील लाखो भारतीय या विजयाचा आनंद साजरा करत आहेत. संघाची रचना देखील भारताचे प्रतिबिंब आहे, कारण सर्व खेळाडू वेगवेगळ्या प्रदेशातून आणि पार्श्वभूमीतून येतात. खेळाडू वेगवेगळ्या प्रदेशांचे, वेगवेगळे सामाजिक पार्श्वभूमीचे आणि वेगवेगळ्या परिस्थितीतून येतात. पण ते एक संघ आहेत, ‘भारत’ संघ भारताचे सर्वोत्तम प्रतिनिधित्व करते.