Translate :

Sponsored

India Wins T20 World Cup 2026, Great News : टिम इंडियाने सलग दुसऱ्यांदा कोरले टी-20 विश्वचषकावर नाव! न्युझीलंडचा 96 धावांनी उडवला धुव्वा : Team India Wins T20 World cup For The Second Time In A Row Beats New Zealans By 96 Runs

टिम इंडियाने सलग दुसऱ्यांदा कोरले टी-20 विश्वचषकावर नाव! न्युझीलंडचा 96 धावांनी उडवला धुव्वा ! ( फोटो - सोशल मीडिया)

India Wins T20 World Cup 2026 : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने इतिहास रचला. न्युझीलंडचा 96 धावांनी पराभव करून टी-20 विश्वचषकावर सलग दुसऱ्यांदा नाव कोरले आहे. त्याआधी भारताे 2007 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली ट्रॉफी जिंकली होती.

अहमदाबाद : 08-03-2026 

आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 चा (India Wins T20 World Cup 2026) महाअंतिम सामना आज यजमान भारत आणि न्युझीलंड या दोन बलाढ्य संघांमध्ये नरेंद्र मोदी स्टेडीयमवर खेळवला गेला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने इतिहास रचला आहे. न्युझीलंडचा 96 धावांनी पराभव करून टी-20 विश्वचषकावर सलग दुसऱ्यांदा नाव कोरले आहे. त्याआधी भारताने 2007 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर 2024 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात ट्रॉफी उंचावली होती तर आता सूर्यासेनेच्या नेतृत्वात भारत पुन्हा टी-20 विश्वविजेता ठरला आहे. या सामन्यात भारताने अनेक रेकॉर्डस मोडत, इतिहास रचला आहे.

भारताचे घरच्या मैदानावर टी-20 कप जिंकणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे. सलग दोन वर्ल्ड कप जिंकणारा भारत हा पहिलाच देश ठरला.

न्यूडीलंडविरूद्ध भारताची धुव्वाधार फलंदाजी  (India Wins T20 World Cup 2026)

नाणेफेक गमावून न्यूझीलंडने भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रिक केले. टीम इंडियाने कोणतीही दयामाया न दाखवता किवी संघाला चांगलेच धुवुन काढलेय भारतीय ओपनरने जी तोडफोड केली ते थांबलेच नाही. पूर्ण विश्वचषकात फार्म न मिळालेला अभिषेक शर्मा फायनलला जबरदस्त खेळला, त्याने 21 चेंडूत 52 धावांची घातक खेळी केली. तसेच आपल्या जबरदस्त फॉर्म असलेल्या संजूने आज पुन्हा चमत्कार केला. त्याने 46 चेंडूत 5 चौकार आणि 8 षटकारासह 89 धावांची खेळी केली. भारतीय संघात पुनरागमन करणारा इशान किशन या सीजममध्ये चांगलाच गाजला त्याने 25 चेंडूत 54 धावा केल्या. शेवटी शिवम दुबेने परफेक्ट फिनिशरची भूमिका निभावली. त्याने 8 चेंडूंत  2 षटकार आणि 3 चौकारसह 26 धावा करत कहर केला आणि किवीसंघासमोर 256 धावांचे लक्ष्य ठेवले. न्यूझीलंडकडून नशीम जेम्सने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तर रचिन रविंद्र आणि मॅट हॅनरी एक विकेट मिळाली.

बुमराह आणि बापूची भन्नाट गोलंदाजी (India Wins T20 World Cup 2026)

लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या किवी संघाची सुरूवात वाईट झालीय सलामीवीर फिन एलन 9 धावा करताच माघारी परतला. टिम सेफर्टन 52 धावा करत संघाला थोडे योगदान दिले. त्यानंतर अक्षर पटलनेे फिरकी मारा करत धडाधड विकेट पडायला सुरूवात केली. न्यूझीलंड कर्णधार मिचेल सँटेनरने संघाला सावरायला सुरूवात केले पण तोही 43 धावा करून बाद झाला. भारताकडून जसप्रीत बुमराहने घातक मारा करत किवीचे कंबरडे मोडले आणि 4 ओव्हर्स टाकून 4 विकेट घेत फक्त 15 धावा दिल्या. न्यूझीलंडचा संघ 19 षटकात फक्त 159 धावा करू शकला.

टी-20 वर्ल्ड कप फायनलसाठी दोन्ही संघाची प्लेईंग -11 (India Wins T20 World Cup 2026)

टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन, तिलक वर्मा, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, जसप्रीत  बुमराह, वरूण चक्रवर्ती. अर्शदीप सिंह,

न्युझीलंड : टिम  सेफर्ट (यष्टीरक्षक), फिन एलन, रचिन रविंद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल. जेम्स नीशम, मिशेल सँटनर (कर्णधार), जेकब डफी, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored