Translate :

Sponsored

India House London, Great news : लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ महाराष्ट्राच्या मालकीचे करण्यासाठी प्रयत्न सुरू, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याचा होणार सन्मान ! : Maharashtra Govt. Plans To Bye Historic India House In London

लंडनमधील 'इंडिया हाऊस' महाराष्ट्राच्या मालकीचे करण्यासाठी प्रयत्न सुरू (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

India House London : महाराष्ट्र सरकारन लवकरच एक मोठी गोष्ट खरेदी करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचा विचार करत आहे. लंडनमधील ऐतिहासिक इंडिया हाऊस खरेदी करण्याची योजना आखत आहे. जाणून घेऊ या सर्व प्रक्रियेविषयी.

लंडन : 13/11/2025

महाराष्ट्र शासनाने परदेशातल्या एका ऐतिहासिक वारशाला (India House London) आपल्या ताब्यात घेण्यासाठीच्या हालचाली सुरू केल्या आहेत.  लंडनमधील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या वास्तूविषयी हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची सर्व माहिती आपण जाणून घेऊ.

संयुक्त बैठकीत झाली चर्चा (India House London)

लंडनमधील या ऐतिहासिक वारशाला ताब्यात घेऊन ती स्मारक स्वरूपात जतन कऱण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. हे पाऊल स्वातंत्र्यलढ्याच्या परंपरेला जागतिक दर्ज्यावर स्थान देण्याचा मानस आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांनी संयुक्त बैठकीत India House खरेदी व संवर्धन याबाबत चर्चा केली आणि एका बहुविभागीय समितीची स्थापना करण्याचा निर्णय झाला आहे. ही समिती कायदेशीर, आर्थिक व प्रशासकीय बाबींचा अभ्यास करून अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केले जाणार आहेत.

शासनाने दाखवलेली भूमिका अशी आहे की, या इमारतीचा ताबा घेतल्यानंतर ती भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृतीचे ध्येय घेऊन एक जागतिक स्मारक म्हणून विकसित केले जाणार आहे. या संदर्भात राज्याचे संस्कृती कार्य मंत्री आशिष शेलार यांनी स्पष्ट केले की, ” लंडनमधील राहणाऱ्या भारतीयांनी या इमारतीचे महत्त्व अधोरेखित केले आहे. आम्ही तिचा ताबा घेऊन स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी जिंवत ठेवू “.

India House इमारत फक्त इमारत नाही (India House London)

इंडिया हाऊस ही फक्त इमारत नाही तर भारताच्या स्वातंत्र्यलढ्याशी प्रत्यक्ष संबंधित ठिकाण आहे. येथे काही काळ कालखंडासाठी वीर सावरकर हे संशोधनार्थ, क्रांतिकारक विचारांसह कार्यरत होते.

  • भारत-भारतीय विद्यार्थ्यांसाठी 1905 मध्ये हा हॉस्टेल व क्रांतिकारी विचारांचा केंद्र म्हणून उभारला गेला होता.
  • महाराष्ट्र सरकारची या उपक्रमातील भूमिका विशेष महत्त्वाची आहे कारण
  • शासकीय ध्येयांना समांतर स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याला जागतिक पटलावर स्थान देणे
  • भारतीय परराष्ट्र व सांस्कृतिक परिप्रेक्ष्यात भारताच्या आवाजाला व स्थानाला खंबीर आधार देणे.

महाराष्ट्रातील संस्कृती विभाग आणि निवडलेले आमदार यांचा सहभाग असल्याने निर्णयाला प्रदेशीय दृष्टीकोनातूनही मजबुती प्राप्त झाली आहे.

असे असतील टप्पे (India House London)

  • कायदेशीर तपासणी – युनायटेड किंगडममधील मालमत्ता खरेदी व हस्तांतरण प्रक्रिया
  • आर्थिक आराखडा – भारत आणि महाराष्ट्र शासन यांच्यातील निधी, खर्च, देखभाल खर्च यांचा समावेश.
  • संवर्धन व स्मारक रूपांतरण – इमारतीचा इतिहास व स्थापत्य टिकवणे, पर्यटन व शैक्षणिक उपयोग सुनिश्चित करणे. जागतिक व स्थानिक भारतीय समुदायाचा सहभाग – लंडनमध्ये व भारतात या प्रकल्पाशी संबंधित जनसंवाद वाढवणे.

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored