Table of Contents
इंडिया गेट , दिल्ली – शूरवीर भारतीय सैनिकांचे स्मृतीस्थळ – (निर्मीतीकाळ – इ.स. १९३१)
देशाची राजधानी दिल्लीमधे अनेक मुघलकालीन वास्तू आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने तेथे बरीच गर्दीही असते. याशिवाय संसदभवन, राष्ट्रपतीभवन अशा वास्तूही पर्यटकांचे आकर्षण केंद्र असतात. यासगळ्यात एक स्थळ असं आहे जे प्रत्येक भारतीयाला अभिमानाने नतमस्तक व्हायला लावते. दिल्लीमधील इंडिया गेट (India Gate) असं ठिकाण आहे की तिथे तुम्ही आपल्या सुरक्षेसाठी रात्रंदिवस झटणाऱ्या शूरवीरांच्या स्मृती जागवू शकतात. मुकपणे त्यांचे आभार मानू शकता.
इंडिया गेटच्या निर्मीतीची कथा !
इंडिया गेट ला (India Gate) ‘अखिल भारतीय युद्ध स्मारक’ असेही संबोधण्यात येते. दिल्ली येथील ‘राजपथ’ येथे हे भव्य स्मारक दिमाखात उभे आहे. याची सरासरी उंची सुमारे ४२ मीटर इतकी आहे. स्वतंत्र भारताचे हे राष्ट्रीय स्मारक आहे. भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी त्याला ‘किंग्सवे’ असे म्हटले जाई. या स्मारकाची निर्मिती इ.स. १९३१ च्याकाळात करण्यात आलेली आहे. पॅरिसच्या ‘के आर्क डे ट्रॉयम्फ’ वरून प्रेरणा घेऊन हे स्मारक बांधण्यात आलेले आहे.
इंग्रजांच्या राजवटीत जे भारतीय सैनिक ब्रिटिश सेनेत भरती होऊन पहिल्या महायुद्धात आणि अफगाण युद्धात शहिद झाले होते त्यांच्या आठवणी प्रित्यर्थ हे स्मारक बांधण्यात आले होते. त्यावेळी या गेटवर युनायटेड किंगडमचे काही सैनिक आणि अधिकारी सहित १३, ३०० सैनिकांची नावं या ठिकाणी कोरण्यात आलेली आहेत. हे स्मारक लाल आणि पिवळ्या रंगाच्या बलुआ दगडांमधे बांधण्यात आलेले आहे.
ज्यावेळी ब्रिटिश राजवटीत हे इंडिया गेट (India Gate) बांधण्यात आले होते त्यावेळी याच्या भव्य गेटच्या समोर जॉर्ज पंचम चा एक पुतळा उभारण्यात आला होता. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ब्रिटीश राजवटीतील अन्य पुतळ्यांसह जॉर्ज पंचमचा पुतळा ‘कोरोनेशन पार्क’ मधे हलवण्यात आला. आता त्याच्या जागी एक छत्री ठेवण्यात आलेली आहे.
स्वातंत्र्यानंतरचे ‘इंडिया गेट’ स्मारकाचे स्वरुप.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ‘इंडिया गेट’ (India Gate) हे भारतीय सेनेतील सैनिकांचे स्मृतीस्थळ बनले आहे. या स्मारकाच्या खाली अमर जवान ज्योती स्थापित करण्यात आलेली आहे. एका काळ्या मार्बल च्या छोट्या उभट चौथऱ्यावर एक रायफल आणि सैनिकांची टोपी ठेवण्यात आलेली आहे. आणि त्याच्या चारही बाजूने सदैव एक ज्योत तेवत असते. या अमर जवान ज्योतीवर दरवर्षी देशाचे पंतप्रधान आणि तीनही सैन्यदलाचे प्रमुख येथे पुष्पचक्र अर्पण करून येथे श्रद्धांजली अर्पण करतात. या गेटच्या संपूर्ण भींतीवर हजारो भारतीय शहीद जवानांची नावे कोरण्यात आलेली आहे. आणि सर्वात वर इंग्रजी भाषेत मजकूर लिहिण्यात आलेला आहे.
“To the death of the Indian armies who fell honored in France and Flanders Mesopotamia and Parisa East Africa Gallipoli and elsewhere in the near and the far east and in scares memory also of those whose names are recorded and who fell in India or the north-west frontier and during the Third Afghan war”.
हे स्मारक भारतीय सैन्यामधील शहिदांसाठी आहे. जे फ्रांस आणि फ्लैंडर्स, मेसोपोटोमिया आणि पर्शिया, पूर्व अफ्रिकेतील गॅलिओपोली आणि इतर जवळपासच्या परिसरात तसेच अफगाणच्या तिसऱ्या युद्धात भारताच्या उत्तर पश्चिम सीमेवर शहिद झालेल्या जवानांच्या पवित्र स्मृती जागवण्यासाठी त्यांची नावे कोरण्यात आलेली आहेत.
निर्मीती पूर्वीचा इतिहास.
१९२०च्या दशकात जुनी दिल्लीचे रेल्वे स्टेशन हे त्याकाळचे संपूर्ण शहराचे एकमात्र रेल्वे स्टेशन होते. हे ठिकाण अत्ताच्या इंडिया गेटच्या आवारातच होते. त्याकाळी या मार्गाला किंग्सवे मार्ग म्हणजे राजाच्या जाण्या येण्याचा मार्ग असे संबोधण्यात येत असे. सध्या यालाच राजपथ असे म्हणतात. नंतर या रेल्वे लाईनला यमुना नदीच्या जवळ स्थानांतरीत करण्यात आले. त्यानंतरच १९२४ ला इंडिया गेटच्या निर्मीतीचा मार्ग खुला झाला.
दिल्लीच्या अनेक महत्त्वाच्या भागांमधे जाण्यासाठी इंडिया गेटच्या परिसरातूनच रस्ता आहे. या इंडिया गेटच्या विस्तिर्ण परिसरात लॉन पसरलेले आहे. रस्त्याच्या समोरच्या भागातही रस्ता ओलांडल्यावर असेच एक विस्तिर्ण लॉन बगीचा आहे. बाजूला चौपाटी करण्यात आलेली आहे. पर्यटकांची तुफान गर्दी असते याठिकाणी. दरवर्षी प्रजासत्ताक दिनाची परेड राष्ट्रपती भवनापासून सुरू होते आणि इंडीया गेटच्या समोरून पुढे लाल किल्ल्याजवळ पोहोचते.
आठवड्याचे सातही दिवस हे स्मारक खुले असते. येथे कुठल्याही प्रकारची प्रवेश फी नाही. दुपार नंतरचा वेळ येथे भेट दण्यासाठी सर्वात चांगला आहे. संध्याकाळनंतर होणारी येथील विद्युतरोषणाई पर्यटकांसाठी आकर्षण असते. आपल्या मनातील देशाभिमान सतत तेवत ठेवण्यासाठी अशा स्मारकांना भेट देणे एक अविस्मरणीय अनुभव असतो. इंडीया गेट हे अशाच प्रेरणा देणाऱ्या पर्यटन स्थळांपैकी एक आहे.
या ठिकाणाला भेट द्यायला कसे जाल ?
This post was last modified on %s = human-readable time difference 12:48 pm