India France Friendship : मॅक्रॉन यांच्या भारत भेटीने फ्रान्ससोबतच्या संबंधांना एक नवी दिशा मिळाली आहे. यामुळे दोन्ही देशांत दिर्घकालीन धोरणात्मक सहकार्य आहे, असे सांगून मॅक्रॉन यांनी भारताचे तोंडभरून कौतुक केले आहे.
मुंबई : 19-02-2026
आज मंगळवारी (19 फेब्रुवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (India France Friendship) यांची मुंबईत ऐतिहासिक बैठक झाली. या भेटीने भारत-फ्रान्स संबंध एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय चर्चेनंतर स्पेशल स्ट्रॅटेजिक ग्लोबल पार्टनशिपची घोषणाही कऱण्यात आली. याच वेळी मॅक्रॉन यांनी भारताचे भरभरून कौतुक केले आहे. त्यांनी जय हो चा नारा देत भारताच्या तांत्रिक प्रगतीवर मोठे विधान केेले आहेत. तसेच या भेटीत दोन्ही देशांतील भविष्यातील सहकार्याचा आराखडाही मांडण्यात आला आहे.
भारताचा जागतिक स्तरावर डंका (India France Friendship)
राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी भारत-फ्रान्स इनोव्हेशन फोरममध्ये भारताच्या तंत्रज्ञान प्रगतीचे तोंडभरून कौतुक केले आहे. त्यांनी, म्हटले की, भारत आता भारत नवीन उपमक्रमांमध्ये प्रगती करेल की नाही हा वादाचा विषय राहिला नसून, भारतासोबत कोण कोण हे कऱण्यासाठी पुढे येणार आहे ते महत्त्वाचे आहे. यासाठी फ्रान्स विश्वासार्ह देश असल्याचेही मॅक्रॉन यांनी ठामपणे सांगितले. ते पुढे म्हणाले की, भारताची तंत्रज्ञानातील प्रगती आता जागतिक स्तरावर मान्य झालेली आहे. यामुळे भारत आणि फ्रान्सचे संबंध जागतिक संतुलनासाठी अधिक महत्त्वपूर्ण असल्याचे मॅक्रॉन यांनी म्हटले.
मॅक्रॉन यांनी आपल्या भाषणात जगभरातील दिग्गज टेक कंपन्यांमध्ये नेतृत्व करणाऱ्या भारताच्या सीईओंचेही कौतुक केले. अल्फाबेट, मायक्रोसॉफ्ट, आयबीएम, ॲडोब सारख्या दिग्गज कंपन्यांच्या नेतृत्वाचा उल्लेख केला. तसेच कोल्पापूरच्या रहिवासी आणि लक्झरी ब्रॅंड शनेलच्या सीईओ लीना नायर यांच्या यशाचेही कौतुक त्यांनी केली.
संरक्षण आणि अवकाश सहकार्य (India France Friendship)
दरम्यान दोन्ही देशांमध्ये संरक्षण आणि अंतराळ सहकार्य वाढवण्यासाठी देखील चर्चा करण्यात आली. या चर्चेत दोन्ही देशांनी मिळून पुढील पिढीचे इंजिन आणि मल्टिलेयर हेलिकॉप्टर विकसित करण्याचा निर्णय घेतला. याशिवाय लढाऊ विमान आणि पाणबुड्यांच्या संयुक्त विकासात फ्रान्स प्रमुख भागीदार ठरला. दोन्ही देशांनी अंतराळ क्षेत्रातील सहकार्य मजबूत करण्यासाठी संयुक्त उपग्रह प्रकल्प द्वारे एकत्रित काम करण्यास सहमती दिली. याशिवाय अणुउर्जा आणि सामान्य लोकांच्या जीवनात तंत्रज्ञानाच्या समावेशवारही सविस्तर चर्चा कऱण्यात आली.
मॅक्रॉन यांनी भारत आणि फ्रान्समध्ये विशेष जागतिक धोरणात्मक भागीदारी संबंध वाढवण्याचा संदेश त्यांनी आपव्या भाषणातून दिला. त्यांनी सांगितले की, दोन्ही देशांतील भागीदारी संरक्षण करारापर्यंत मर्यादित नसून दीर्घकालीन धोरणात्मक सहकार्यावर आधारित आहे.
This post was last modified on February 18, 2026 3:50 pm