Imran Khan News : इम्रान खान यांच्या तीन बहिणींनी आरोप केला आहे की, त्यांना माजी पंतप्रधानांना भेटू दिले जात नाही. तुरूंगात असलेल्या नेत्यांच्या समर्थकांनी निदर्शनेही केली आहेत.
कराची : 26/11/2025
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan News ) यांच्याबद्दल पुन्हा एकदा अफवांचे वातावरण गरम झाले आहे. पाकिस्तानच्या राजकारणातून पूर्वीच्या राष्ट्रप्रमुखांची हत्या किंवा फाशी देणे यांसारख्या घटना सामान्य असल्याने, सध्या इम्रान खान यांची जेलमध्येच हत्या झाल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या चर्चांमुळे त्यांचे समर्थक संतत्प झाले असून, देशात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
Table of Contents
बहिणींना भेट नाकारली, केला लाठीमार (Imran Khan News )
इम्रान खान यांच्या तीन बहिणी आहेत. नूरीन खान, अलिमा खान आणि उज्मा खान यांनी धक्कादायक दावा केला आहे की, त्यांना गेल्या तीन आठवड्यांपासून त्यांच्या भावाला भेटू दिलेले नाही. जेव्हा त्यांनी भेटीची मागणी केली, तेव्हा पोलिसांनी त्यांच्यावर क्रूरपणे लाठीमार केला. बहिणींनी पोलिसांच्या मारहाणीचा आणि गैरवर्तनाचा आरोप केला आहे. इम्रान खान यांच्या पक्षाने (PTI) म्हटले आहे की, त्यांच्या समर्थकांवर आणि बहिणींवर पोलिसांनी अकारण हल्ला केला. पक्षाने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.
वृद्ध बहिणीला केस पकडत फरपटत नेले (Imran Khan News )
इम्रान खान यांच्या बहिणींनी पंजाब पोलीस प्रमुख उस्मान अन्वर यांना पत्र लिहिले आहे, ज्यात त्यांनी आणि समर्थकांनी कोणत्याही चिथावणीशिवाय शांततापूर्ण आंदोलन करत असताना पोलिसांनी क्रूरपणे मारहाण केली. नूरीन नियाजी यांनी पत्रात म्हटले आहे की, “आम्ही इम्रान खान यांच्या तब्येतीबाबत चिंतेत आहोत. म्हणून आम्ही शांततापूर्ण आंदोलन करत होतो. आम्ही कोणताही रस्ता अडलला नाही किंवा सार्वजनिक गैरसोय केली नाही. तरीही पोलिसांनी आमच्या लोकांना मारहण करण्यास सुरूवात केली. 71 वर्षांच्या मला केस पकडून फरपटवण्यात आले आणि मला जखमा झाल्या आहेत.
वकिलांनाही भेटण्यास नकार (Imran Khan News )
इम्रान खान यांच्या वकिलांनाही त्यांच्या अशिलांना भेटण्यास नकार मिळाला असल्याची तक्रार आहे. वकील खालिद युसूफ चौधरी यांनी सांगितले की, त्यांची इम्रान खान यांच्याशी भेट झालेली नाही. त्यांच्यापर्यंत आवश्यक वस्तूही पोहोचू दिल्या जात नाहीत.
अफगानिस्तानात शंका आणि बातम्या
अफगानिस्तानच्या माध्यमांमध्ये इम्रान खान यांच्या हत्येच्या शक्यतेबद्दल बातम्या प्रसिद्द झाल्या आहेत. पाकिस्तान सरकार, लष्कर किंवा जेल प्रशासनाकडून याबाबत कोणतेही अदिकृत विधान जाहीर झालेले नाही. परंतु पाकिस्तानी माध्यमांनी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने वृत्त खोटे असल्याचे म्हटले आहे. इम्रान खान जिवंत असल्याचे म्हटले आहे. पण सरकारी मौनामुळे इम्रान खान यांची प्रकृती कशी आहे आणि ते जिवंत आहेत की नाहीत याबद्दल सर्वत्र शंका आणि अफवा निर्माण होत आहेत.