ICMR Study Reports : देशात गेल्या काही काळात हार्ट ॲटकचे प्रमाण वाढले आहे. हे वाढते प्रमाण कोविड वॅक्सिनमुळे वाढले असल्याचे बोलले जात आहे. मात्र आता ICMR चा एक अहवाल समोर आला आहे. ज्यात कोविड वॅक्सिनविषयी करण्यात येणाऱ्या या दाव्याला फेटाळून लावण्यात आले आहे.
दिल्ली : 02/07/2025
गेल्या काही महिन्यात देशात हार्ट ॲटक येऊन मृत्यूचे प्रमाण बरेच वाढले आहे. हे ॲटक कोविड वॅक्सिनमुळे येत असल्याचे बोलले जात आहे. मात्र याच्या मागचे खरे कारण काय आहे ? खरंच का कोविड वॅक्सिनमुळे हार्ट ॲटक येत आहेत ? या सर्व प्रश्नांचे उत्तरं आता ICMR च्या एका संशोधन अहवालातून समोर आले आहे.
ICMR म्हणजे इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि एम्स यांच्यातर्फे केल्या गेलेल्या एका अभ्यासातून असे समजले आहे की, कोविड-19 नंतर वयस्कर व्यक्तींच्या अचानक होणाऱ्या मृत्यूशी कोरोना वॅक्सिनचा काहीही संबंध नाही. ICMR च्या या अहवालाने सर्व शंकां निरर्थक असल्याचे सिद्ध झाले आहे.
आरोग्य मंत्रालयाने काय म्हटले आहे ?
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, तरूणांमध्ये वाढलेले हार्ट ॲटकचे प्रमाण आणि कोरोना वॅक्सिन यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. मंत्रालयाचे असे म्हणणे आहे की, ICMR ने केलेल्या संशोधनात असा कोणताही एकमेकांशी संबंध आढळलेला नाही.
संशोधनाचा कालावधी
हे संशोधन ऑगस्ट 2023 मध्ये देशातील एकुण 19 राज्यांमध्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये मिळून 47 रूग्णालयात करण्यात आले. हे संशोधन अशा लोकांवर करण्यात आले आहे की, जे पूर्णपणे निरोगी होते, मात्र ऑक्टोबर 2021 ते मार्च 2023 च्या मधे त्यांचा अचानक मृत्यू झाला. अभ्यासातून हे समजले आहे की, कोरोना वॅक्सिन आणि तरूणांमध्ये आलेले हार्ट ॲटक यांचा काहीही संबंध नाही. या अभ्यासातून हे समोर आले आहे की, तरूणांमध्ये हार्ट ॲटक येण्याचे प्रमाण हे त्यांची जीवनशैली हे आहे.
सिद्धारमैया यांनी व्यक्त केली होती शंका
कर्नाटकमधील हालिया येथे हार्ट ॲटकने सुमारे 20 लोकांचा मृत्यू झाला . येथील या मृत्यूच्या घटनांमुळे मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी मंगळवारी ही शंका उपस्थित केली होती की, कोविडच्या वॅक्सिनला घाईघाईत मंजूरी दिल्यामुळे लोकांनी वॅक्सिन घेतले आहेत. आणि हे त्यांच्या जीवावर बेतत आहे.