Translate :

Sponsored

Heavy Rain Warning, High Alert, 2026 : गुजरात, ओडीशासह देशातील 12 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा, पुढील तीन दिवस महत्त्वाचे : Heavy Rain Warning For 12 States In The Country

गुजरात, ओडीशासह देशातील 12 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा, पुढील तीन दिवस महत्त्वाचे

Heavy Rain Warning : भारतीय हवामान विभागाने पुढील तीन दिवसांसाठी राज्यातील काही भागांमध्ये, तसेच शेजारील अरूणाचल प्रदेश आणि नागालँडमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

नवी दिल्ली : 31-07-2026 

गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यात आता हवामान विभागाने (Heavy Rain Warning 12 ) राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, मेघरगर्जनेसह पाऊस आणि वादळांचा इशारा दिला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दिल्ली, उत्तरप्रदेश, बिहार, छत्तीसगढ, ओडीशा, गुजरात, तामिळनाडू, राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, अरूणाचल प्रदेश व नागालँड या राज्यांना पावसाचा इशारा दिला आहे.

या काळात वाऱ्याचा वेग ताशी 60 किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. भारतीय हवामान विभागाने पुढील तीन दिवसांसाठी राज्यातील काही भागांमध्ये, तसेच शेजारील अरूणाचल प्रदेश आणि नागालँडमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

राजधानीला इशारा  (Heavy Rain Warning)

हवामान विभागाने दिल्लीसह संपूर्ण राष्ट्रीय राजधानी क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वाऱ्यांचा इशारा दिला आहे. जम्मू-काश्मीरमधील डोडा आणि किश्तवार जिल्ह्यांच्या बहुतांश भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेजारील किश्तवार जिल्ह्यातही, सततच्या मुसळधार पावसामुळे रस्ते निसरडे होण्याची आणि दगड कोसळण्याची चिंता जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली आहे. जतनेला सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

जुलैमध्ये पावसाची विक्रमी नोंद  (Heavy Rain Warning)

महाराष्ट्रातही मुसळधार पाऊस झाल्याचे पहिला मिळाले. मुंबईसह इतर अनेक शहरांत पाऊस झाला होता. त्यात पुणे शहराने यंदाच्या जुलैमध्ये विक्रमी पावसाची नोंद करत 119 वर्षापूर्वीचा विक्रम मोडला आहे. भारतीय हवामानशास्र विभागाच्या (आयएमडी) शिवाजीनगर वेधशाळेच्या नोंदीनुसार, बुधवारी (ता.29) सकाळपर्यंत जुलै महिन्यात 508.9 मिमी पावसाची नोंद झाली आहे. यापूर्वी 1907 मध्ये 508.5 मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे तब्बल 119 वर्षांनंतर पुण्यात जुलै महिन्यातील सर्वाधिक पावसाचा नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे.

महाराष्ट्रात पाऊसाचा जोर कायम (Heavy Rain Warning)

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम असल्याचे दिसून येत आहे. कोकण, विदर्भ, मराठवाडा भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. येत्या काही दिवसांमध्ये विदर्भ आणि मराठवाडा जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. हिंगोली जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored