मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरात पाऊस सुरू आहे, त्यामुळे महाराष्ट्रात हाय अलर्ट (Heavy Rain Altert) दिला आहे. पावसाची सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई : 2025-05-21
गेल्या दोन-तीन दिवसांपासून महाराष्ट्रात काही भागात जोरदार पाऊस सुरू झाला आहे, मे महिन्याच्या मध्यालाच हा पाऊस यावर्षी सुरू झाला आहे. मुंबईच्या पूर्व उपनगरांमध्येही भरपूर पाऊस सुरू झाला आहे. मुंबईच्या भांडूप, मुलुंड,विक्रोली आणि घाटकोपर भागात मुसळधार पाऊस झाला. हवामान विभागाने बुधवारी काही भागात जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता सांगितली होती. मंगळवारी मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे हवामान विभागाने अनेक भागात हाय अलर्ट (Heavy Rain Altert) दिला आहे.
पुण्यात मंगळवारी दुपारी मुसळधार पाऊस झाला. कोंढवा आणि कात्रज भागातही खुप पाऊस झाल्याची नोंद आहे. त्यामुळे हवामान खात्याने पुणे शहर आणि जिल्ह्यात ऑरेंज हाय अलर्ट (Heavy Rain Altert) जाहीर केला आहे. पुण्यातील अनेक भागात मुसळधार पाऊसामुळे ठिकठिकाणी पाणी साठले आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी लांबच लांब वाहनांच्या रांगा लागलेल्या बघायला मिळाल्या. त्यामुळे शहरातील अनेक भागात वाहतूक कोंडी झाल्याचेही निर्दशनास आले.
मराठवाडा, विदर्भ, कोंकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊसाने धुमाकुळ घातला आहे. महाराष्ट्रात पाऊस 6 जूनच्या आसपास सुरू होणार होता, मात्र मे महिन्याच्या मध्यातच हा पाऊस येत आहे. सुरुवातीलाच इतका पाऊस सुरू झाल्याने, हवामान विभागाने ऑरेंज हाय अलर्ट (Heavy Rain Altert) दिला आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलेले निर्देश
मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलेल्या निर्देशानुसार 21 आणि 22 मे ला सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याच्या आसपासच्या समुद्री भागात वादळाची शक्यता आहे. समुद्राच्या मध्यभागी वादळ-वाऱ्यामुळे समुद्र खवळलेला असणार आहे.
22 ते 24 मे दरम्यान रत्नागिरी, मुंबई आणि पालघरजवळ समुद्र खवळलेला राहणार आहे. जोरदार वाऱ्यांमुळे खोल समुद्रात परिस्थिती अशांत राहिल. मच्छिमारांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी 21 ते 24 मे दरम्यान हवामान परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवावे आणि अरबी समुद्राच्या खोल पाण्यात जाणे टाळावे.
विजांच्या कडकडाट, जोरदार वारे
विजांच्या कडकडाटामुळे इतर जिल्ह्यांमुळे इतर जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे वाहतील. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार वारे वाहतील आणि गडगडाटी वादळं येतील. या भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा, धाराशिव, सांगली, सोलापूर, लातूर, सिंधूदुर्ग आणि पुणे येथेही पावसाचा ऑरेंड अलर्ट जाहिर केला आहे. येथे मुसळधार पावसासह विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे.