Hasan Mushrif : राज्यातील पत्रकारांसाठी राज्याचे वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांनी महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. यामुळे पत्रकारांना मोठी मदत होणार आहे. काय आहेत हे निर्देश जाणून घेऊ.
मुंबई : 15/10/2025
राज्यातील पत्रकारांना कॅशलेस आरोग्य सेवा पुरवण्यासाठी समिती स्थापन करावी. तसेच,या समितीने महात्मा फुले जन आरोग्य योजना, केंद्र शासन आणि मध्य प्रदेश सरकारच्या योजनांचा अभ्यास करून सविस्तर प्रस्ताव सादर करावा असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत. यावेळी मंत्रालयात मंत्री मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकारांच्या आरोग्य समस्यांबाबत बैठक पार पडली.
यावेळी सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव निपुण विनायक, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार, आरोग्य सेवा आयुक्त कादंबरी बलकवडे, वैद्यकीय शिक्षण आयुक्त डॉ. अनिल भंडारी, माहिती व जनसंपर्क संचालक किशोर गांगुर्डे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक, राज्य अधिस्वीकृती समिती अध्यक्ष यदु जोशी, मंत्रालय व विधिमंडळ वर्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, मराठी पत्रकार परिषदेचे किरण नाईक, मुंबई विभागीय अधिस्वीकृती समिती अध्यक्ष दिपक कैतके, राज्य अधिस्विकृती समिती सदस्य विनोद जगदाळे , नेहा पुरव, संजय मलमे, संजय पितळे, जयेश सामंत उपस्थित होते.
समितीच्या कामकाजाचे उद्दिष्ट (Hasan Mushrif)
मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले की, मध्य प्रदेशमधील पत्रकारांसाठीच्या कॅशलेस आरोग्य सेवा योजनेचा अभ्यास करून त्यापासून राज्यातील परिस्थीशी सुसंगत प्रस्ताव तयार करावा. यामध्ये राज्य व केंद्राच्या आरोग्य योजना, तसेच CSR चा विचार समाविष्ट केला जावा.मोठ्या शहरांमध्ये पत्रकारांना कॅशलेस आरोग्य सेवा कश प्रकारे दिल्या जाऊ शकतात, यावर लक्ष दिले जाईल.
पत्रकारांसाठी शिबिरांचे आयोजन (Hasan Mushrif)
सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले की, पत्रकारांसाठी वर्षातून दोन वेळा विशेष आरोग्य शिबिरे आयोजित केली जातील. यात महिला पत्रकारांसाठी विशेष शिबिर घ्यावे, महात्मा फुले जन आरोग्य योजना पत्रकारांना लागू आहे. त्याच्या कार्डचे पत्रकारांना वाटप व्हावे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने सध्या अस्तित्वात असलेली शंकरराव चव्हाण पत्रकार सन्मान निधी योजना आणकी व्यापक करण्यासाठीचा प्रस्ताव सादर करावा.