Governor Radhakrishnan : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी सांगितले की, महाराष्ट्रानेही आपला स्वतःचा दूध ब्रँड तयार केला पाहिजे. राज्याने साखर कारखान्यांच्या आधुनिकीकरणावरही भर द्यायला हवं, असेही त्यांनी आवाहन केले आहे.
मुंबई : 07/07/2025
आंतरराष्ट्रीय सहकारीता वर्ष 2025 आणि केंद्रीय सहकारिता मंत्रालय स्थापना दिवसात्या नि्मित्ताने सोमवारी राजभवनामध्ये महाराष्ट्र सरकारच्या सहकार, विपणन आणि वस्र विभागातर्फे एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आवाहन केले आहे, ज्याप्रमाणे गुजरात सरकारने दूध उत्पादनामध्ये सहकार क्षेत्राच्या माध्यमातून अमूल, दिल्लीने मदर डेअरी आणि कर्नाटकाने नंदिनी हा ब्रँड तयार केला आहे. अशाप्रकारे महाऱाष्ट्रानेही सहकाराच्या माध्यमातून दूध क्षेत्रात एक मोठा ब्रँड तयार करण्यात यावा.
एकीच्या भावनेने होतो विकास
राज्यपाल राधाकृष्णन यांनी सांगितले की, 2047 पर्यंत भारत विकसीत देश म्हणून ओळखला जावा असे वाटत असेल तर, देशातील विकास हा सर्वसामावेशक असायला हवा. विकास हा सर्वसमावेशक तेव्हाच होतो, जेव्हा सर्व क्षेत्रात सहकारीता अवलंबली जाईल. सहकाराच्या माध्यमातून आंदोलनं उभी राहून, नेतृत्व निर्माण व्हायला हवेत. सहकाराच्या आंदोलनातून महाराष्ट्राला आजपर्यंत अनेक चांगली नेतृत्व दिले आहेत. ‘मी’ च्या भावनेने सहकार क्षेत्राचा विकास होत नाही, तर ‘आपण’ या भावनेने सहकार क्षेत्राचा विकास होत असतो. सहकार क्षेत्रात शिक्षित आणि प्रशिक्षित लोकांचा सहभाग असणे आवश्यक आहे. राज्यपाल असेही म्हणाले की, राज्यात ज्या भागात सहकारिता आंदोलन मजबूत आहे, त्या भागातील विद्यापिठांमध्ये सहकारितेवर डिर्गी कोर्स सुरू केले पाहिजे.
यावेळी राज्यपालांनी सिक्किम राज्याचे उदाहरण दिले आहे. सिक्कीम हे पूर्ण जैविक शेती कऱणारे राज्य बनले आङे. आज जैवीत खाद्य पदार्थांची मागणी वाढली आहे. जैवीक शेती ही शेतकऱ्यावर ओझं न बनता, ते त्यांच्यासाठी एक आंदोलन झाले पाहिजे.
साखर कारखान्यांना आधुनिकीकरणाशिवाय पर्याय नाही
राज्यपाल म्हणाले की, साखर कारखान्यांच्या आधुनिकीकरणावर भर द्यायला हवा. त्याशिवाय साखर कारखाने सुरू राहू शकणार नाहीत. यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कौशल विकास मंत्री, मंगल प्रभात लोढा, सहकार आणि गृह राज्य मंत्री डॉ. पंकज भोयर, राज्यपाल सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, सहकारिता आयुक्त दिपक टावरे, सहकारिता विभागाते संयुक्त सचिव संतोष पाटील, सहकार विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.