महाराष्ट्र : 2025-06-03
महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्री आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी मंगळवारी गोपीनाथ गड येथे हजेरी लावली. त्यांचे वडील आणि भाजपाचे दिग्गज नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde ) यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांनी मुंडे यांचे स्मारक गोपीनाथगढ येथे एका सभेचे आयोजन केले होते. यावेळी त्या भावूक झाल्याचे दिसले. त्या म्हणाल्या, जर लोकं माझ्या सोबत असतील तर मी कोणत्याही संकटाचा सामना करायला तयार आहे. यावेळी त्यांनी पांडवांच्या वनवासासुद्धा उल्लेख केला. त्या म्हणाल्या जीवनात खऱ्या आणि सरळमार्गी लोकांना कायम संकटांचा सामना करावा लागतो.
पंकजा मुंडे या दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde ) यांच्या पुण्यतिथी निमित्त गोपीनाथगडावर बोलत होत्या. यावेळी त्यांनी आपल्या राजकीय भाषणात लोकांना आपल्याला साथ देण्याचे भावनिक आवाहन केले. त्यांनी या भाषणात कौरव आणि पांडवांच्या भांडणाचाही उल्लेख केला. यानिमित्ताने बऱ्याच दिवसांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे नेते आणि पंकजा मुंडे यांचे चुलत बंधु हे सार्वजनिक व्यसपीठावर दिसून आले.
खऱ्या लोकांना संकटांचा सामना करावा लागतो.
बीडचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली. त्या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराड याच्याशी धनंजय मुंडे यांचे सबंध असल्याने टिका झाली. ज्यामुळे त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा राजिनामा द्यावा लागला. पंकजा मुंडे यांनी त्यासंदर्भात म्हटले की, खऱ्या लोकांना नेहमी संकटांचा सामना करावा लागतो. कौरव आणि रावणाला वनवास नाही झाला, पण पांडवांना वनवासाला जावे लागले.
जर लोकं सोबत असतील तर मी संकटांना सामोरे जायला तयार
जर लोकं माझ्या सोबत असतील, तर मी प्रत्येक संकटांना तोंड द्यायला तयार. आपल्या वडिलांच्या निधनानंतरच्या आपल्या प्रवासाविषयी बोलताना त्या (Pankaja Munde) म्हणाल्या, मी गेल्या 11 वर्षांपासून या व्यासपिठावर येऊन बोलत आहे. जेव्हा गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाले, तेव्हा असे वाटले की आमच्यावर वीज येऊन कोसळली आहे. त्यांनी आपल्या भाषणात महाभारतातील द्रौपदीच्या संकटांचा उल्लेख केला. द्रौपदीवर संकट आले. तेव्हा सुरूवातीलाच तिने मदतीसाठी भगवान श्रीकृष्णाला हाक मारली नाही. जेव्हा तीने त्यांना बोलावले, तेव्हा ते तिच्या मदतीसाठी प्रकट झाले. भगवान सुद्धा आपण जोपर्यंत काही मागत नाही, तोपर्यंत आपल्याला काही देत नाहीत.
या कार्यक्रमाच्या वेळी धनंजय मुंडे यांनी कोणतेही भाषण केले नाही.