Google Home page AI Mode : गुगलच्या होमपेजवर सध्या वेगळेपण पहायला मिळत असेल. तर ते आहे AI मोडचा एक ॲनिमेेटेड प्रमोशनल व्हिडीयो. हा व्हिडीयो एआयच्या वापराला प्रोत्साहन देणारा ठरणार आहे.
तंत्रज्ञान : 03/07/2025
मंगळवारी जर तुम्ही गुगलच्या होमपेजला भेट दिली असेल तर, त्यात तुम्हाला नक्कीच वेगळेपण बघायला मिळाले असेल. नेहमी तिथे डुडल असते. त्याजागी आज एआय मोडचा एक ॲनिमेटेड प्रमोशनल व्हिडीयो बघायला मिळाला. हे काही सामान्य डुडल नाही, तर जेमिनी एआय वर आधारित गुगल चा नविन प्रमोशनल व्हिडीयो आहे. जो गुगलच्या या नविन शोधाची जाहिरात करण्यासाठी केले गेला आहे.
काय आहे गुगलचे नविन एआय मोड आणि कसे काम करते ते ?
AI मोडचे गुगलचे नविन फिचर आहे. या गुगल मोडला मार्च 2025 मध्ये काही निवडक देशांमध्ये सर्च रिजल्टसाठी सुरू करण्यात आले होते. आज या मोडला मोठ्या प्रमाणात दाखवण्यात आले आहे. हे फिचर जेमिनी वर आधारित आह. हे गुगलचे सर्वात प्रगत मोठे लँग्वेज मॉडेल (LLM) आहे. याच्या मार्फत युजर्स
- गुंतागुंतीचे आणि बहुस्तरिय प्रश्न विचारू शकतात.
- विस्तृत आणि AI द्वारे जनरेटेड उत्तर मिळू शकतात.
- शब्द, आवाज किंवा चित्र यांच्यामाध्यमातून माहीतीशी संपर्क होऊ शकतो.
हे नविन फिचर संवादात्मक सर्चींगला प्रोत्साहन देते. ज्याच्याद्वारे युजर्सला एका पेक्षा जास्त प्रश्नांची उत्तरे एकाचवेळी आणि सविस्तर मिळू शकणार आहे.
AI च्या शर्यतीत Google ची आक्रमक खेळी
गुगलने ज्याप्रकारे डुडलच्या जागी AI मोडचा वापर करून दाखवून दिले आहे की, गुगल या फिचरविषयी किती गंभीर आहे. गुगलच्या प्रवक्त्यांनी सांगितले आहे की, हे फक्त एक पारंपारिक डुडल नसून एक मजेदार प्रमोशनल व्हिडीयो आहे, ज्याचा उद्देश AI च्या वापराविषयीची जागरूकता वाढवणे हे आहे. गुगलचा उद्देश OpenAI’s chatGPT, claude आणि perplexity AI सारख्या AI टुल्सला टक्कर देणे हा आहे. तसेच युजर्स ने पारंपरिक पद्धतीने सर्च करण्या एवजी नविन AI मोडचा वापर करून सर्च करावे यासाठी हा नविन प्रमोशनल व्हिडियो त्यांच्या होमपेजवर टाकण्यात आला आहे.