Translate :

Sponsored

Goa Arpora Fire, Shocking News : गोव्यातील आगीच्या घटनेवर पंतप्रधान मोदींनी केला शोक व्यक्त, मृतांच्या वारसांना मिळणार 2 लाखांची मदत : PM Narendra Modi Condolences On Goa Arpora Night Club Fire

गोव्यातील आगीच्या घटनेवर पंतप्रधान मोदींनी केला शोक व्यक्त, मृतांच्या वारसांना मिळणार 2 लाखांची मदत

Goa Arpora Fire : गोव्यातील अर्पोरा येथील एका नाईट क्लबमध्ये आगीची घटना घडली. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त करून मृतांच्या वारसांना मदत जाहीर केली.

नवी दिल्ली :07/12/2025

गोव्यामधील भीषण आगीची घटना (Goa Arpora Fire ) घडली आहे. अर्पोरा येथील एका नाईट क्लबमध्ये आगीटी घटना घडली. या आगीचे प्रमाण भीषण असल्यामुळे यामध्ये तब्बल 25 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मध्यरात्री लागलेल्या या आगीमध्ये क्लब पूर्णपणे जळून खाक झाला आहे. यामध्ये जखमींचीं संख्या बरीच मोठी आहे. अनेकांना रूग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. गोव्यातील या अग्नीतांडवावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच मृतांच्या वारसांना मदत जाहीर केली आहे.

गोव्यातील अर्पोरा नाईटक्लबमध्ये सिलेंडरचा मोठा स्फोट झाला. या स्फोटानंतर भीषण आग लागली. या लागलेल्या आगीत 23 जणांचा मृत्यू झाला अशी माहिती आहे. शनिवारी रात्री उशिरा उत्तर गोव्यात एका नाईटक्लबमध्ये सिलेंडरचा स्फोट झाला. सिलेंडरच्या स्फोटामुळे नाईटक्लबमध्ये आगीचे तांडव सुरू झाले. यामुळे हा नाईटक्लब जळून खाक झाला आहे. आगीचे कारण सिलिंडरचा स्फोट असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेनंतर त्वरीत पंतप्रधानांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी फोनवरून संवाद साधला आणि घटनेची माहिती जाणून घेतली आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घटनास्थळी धाव  (Goa Arpora Fire)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडून गोव्यातील या प्रकरणाची माहिती जाणून घेतली. तसेच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी देखील घटनास्थळी भेट दिली. येथील लोकांचे मृत्यू हे आगीत, धुरात गुदमरल्यामुळे झाल्याचे निष्मन्न झाले आहे. ही घटना स्थानिक वेळेनुसार रात्री 12:04 वाजता आर्पोरा गावात घडली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, राज्य सरकारने घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या वारसांना 2 लाख रुपये मदत कऱण्याचे जाही केले. तसेच जखमींना 50 हजार रुपये देणार असल्याचे जाहीर केले आहे.

पंतप्रधान मोदींनी केला शोक व्यक्त  (Goa Arpora Fire)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत या गोव्यातील अग्नितांडवावर शोक व्यक्त केला. नरेंद्र मोदी यांनी लिहिले आहे की, गोव्यातील अर्पोरा येथील आगीची दुर्घटना अत्यंत दुखःद आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहे, त्यांच्याबद्दल माझ्या संवेदना आहेत. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी परिस्थितीबद्दल बोललो. राज्य सरकार बाधितांना सर्वोतपरी मदत करत आहे, असे पंतप्रधान मोदींनी लिहिले आहे.

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored