Translate :

Sponsored

Global Trade , Good News : ‘मदर ऑफ ऑल डील’ नंतर भारताची आणखी एक खेळी ! एस. जयशंकर आणि मार्को रूबियो यांच्यात होणार मसलत : S.Jaishankar Visit Us Critical Minerals Meeting India EU FTa Impact 2026

'मदर ऑफ ऑल डील' नंतर भारताची आणखी एक खेळी ! एस. जयशंकर आणि मार्को रूबियो यांच्यात होणार मसलत

Global Trade : परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर पुढील आठवड्यात अमेरिकेला भेट देण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र सचिवांनी आयोजित केलेली ही पहिली उच्चस्तरीय बैठक आहे.

दिल्ली : 29-01-2029

जागतिक राजकारणात भारताने आपली मुत्सद्देगिरी सिद्ध करून एक महत्तवाचा करार (Global Trade) नुकताच पूर्ण केला आहे. युरोपियन युनियनसोबत दोन दशकांपासून प्रलंबित असलेला ऐतिहासिक मुक्त व्यापार करार (FTA) यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर, आता भारताचे लक्ष अमेरिकेकडे वळले आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर पुढील आठवड्यात अमेरिकेच्या दौऱ्यावर जात असून, त्यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. “भारत-अमेरिका” संबंधांमधील तणाव निवळण्याच्या दृष्टीने एक संधी म्हणून या भेटीकडे पाहिले जाणार आहे.

वॉशिंग्टनमध्ये  ‘ क्रिटिकल मिनरल्स’ वर महामंथन (Global Trade)

परराष्ट्र मंत्री जयशंकर 4 आणि 5 फेब्रुवारीला वॉशिंग्टन डीसीमध्ये होणाऱ्या पहिल्या ‘क्रिटीकल मिनरल्स ‘ मंत्रिस्तरीय’ बैठकीला उपस्थित राहतील. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रूबियो यांच्या निमंत्रणावरून हा दौरा होत आहे. या बैठकीचा मुख्य उद्देश लिथियम, कोबाल्ट आणि निकेल सारख्या महत्त्वाच्या खनिजांची जागतिक पुरवठा साखळी सुरक्षित करणे हा आहे. इलेक्ट्रिक वाहने आणि संरक्षण क्षेत्रासाठी ही खनिजे अत्यंत महत्त्वाची आहेत. भारताचा या गटात समावेश होणे, हे जागतिक पुरवठा साखळीत भारताचे वाढते महत्त्व अधोरेखित करते.

EU सोबतचा करार आणि अमेरिकेवर दबाव (Global Trade)

भारताने 27 जानेवारी 2026 रोजी युरोपियन युनियनसोबत ऐतिहासिक व्यापारी करार केला आहे. या करारामुळे कापड, चामड्याच्या वस्तू, दागिने आणि सागरी उत्पादने यांसारख्या भारतीय क्षेत्रांना युरोपच्या 450 दशलक्ष लोकसंख्येच्या बाजारपेठेत मोठा फायदा मिळणार आहे. विशेष म्हणजे, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 % आयात शुल्क लादलेले असताना, भारताने युरोपशी हातमिळवणी करून स्वतःसाठी एक मोठा पर्याय उपलब्ध करून घेतला आहे. यामुळे अमेरिकेवरही भारतासोबतचा व्यापार करार लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी एक प्रकारे दबाव निर्माण झाला आहे.

ट्रम्प प्रशासनासोबत पहिली उच्चस्तरिय भेट

डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपद स्वीकारल्यानंतर आणि मार्को रुबियो परराष्ट्र सचिव बनल्यानंतर, जयशंकर यांची ही पहिलीच प्रत्यक्ष भेट असेल. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार वाटाघाटी सध्या 50 % टॅरिफ आणि रशियाकडून घेतलेल्या तेलाच्या मुद्दयावर अडकल्या आहेत. मात्र माहितिनुसार दोन्ही देश एका संतुलिक व्यापार कराराच्या (BTA) अत्यंत जवळ आहेत. या दौऱ्यात जयशंकर ‘Pax Silica’ या अमेरिकेच्या नेतृत्वाखालील तंत्रज्ञान पुढाकारात भारताच्या सहभागावरही चर्चा करू शकतात.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored