X

Translate :

Sponsored

Global Family Day – 1st January 2025 A day that promotes love, co-operation and bonding !

जागतिक कुटुंब दिवस ( Global Family Day ) – १ जानेवारी २०२५ ! प्रेम, सहकार्य आणि बंध वाढवणारा दिवस !

आज सगळं जग सोशल मीडियाच्या माध्यमातून जवळ आले आहे. अनेक नवनविन तंत्रज्ञानांच्या वापराने माणसाच आयुष्य बरंच सुखकर झालंय अस वरवर आपल्याला वाटतं. परंतु आज माणूस खरोखर फार एकटा पडला आहे. अनेक घटना सांगतात की, जगभरातच आत्महत्येच्या घटना वाढत आहेच. नैराश्य, मानसिक आजार यांच्यामध्ये वाढ होताना दिसत आहे. या सगळ्या समस्या कमी करण्यासाठी आपली कुटुंबव्यवस्था भक्कम असणे फार महत्त्वाचे असते.

भारत असो की दुसरे देश कुटुंबसंस्था निकोप समाजाच्या वाढीत एक महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. म्हणूनच दरवर्षीच्या १ जानेवारीला संपूर्ण जगात हा दिवस जागतिक कुटुंब दिवस म्हणून साजरा करतात. आज मिसलेनियस वर्ल्डच्या या भागात आपण याच दिवसाविषयीची माहिती घेणार आहोत.

जागतिक कुटुंब दिवस ( Global Family Day ) – दरवर्षीच्या १ जानेवारीला जगभरात कुटुंब दिवस साजरा केला जातो. जगभरातील सर्व कुटुंबांना एकत्र आणून त्यांच्यातील बंध मजबूत करण्याच्या हेतूने हा दिवस साजरा केला जातो. कुटुंबांना समर्पित करणारा असा दिवस. हा दिवस प्रेम, समजूतदारपणा आणि शांतता या भावनांवर लक्ष केंद्रित करून नवीन वर्षाची सुरूवात करणारा असे या दिवसाचे विशेष म्हणता येईल.

प्रत्येक देशातील प्रत्येक कुटुंब हे समाजाचा आधारस्तंभ असते. निकोप समाजाची निर्मीती होण्यासाठी समाजातील कुटुंबांमध्ये निकोप प्रेम असणे फार आवश्यक आहे. मात्र आजच्या धकाधकीच्या जीवनात कुठेतरी कुटुंबाला वेळ देणे अवघड होत जात आहे. त्यासाठी सजगतेने प्रयत्न करण्याची गरज असते. त्यातूनच हा दिवस ( Global Family Day ) साजरा होत असतो.

कुटुंबांमध्ये एकजुटीच्या भावनेची देवाणघेवाण व्हावी या साठी इतर अनेक सणांप्रमाणे एकमेकांना शुभेच्छा देणे, शुभेच्छापत्र देणे, सहलींचे आयोजन करणे, संदेशपत्र देणे असे अनेक उपक्रम करण्यात येतात. देशाच्या सीमा, संस्कृती आणि श्रद्धा यांच्या पलिकडे जाऊन प्रेमाच्या भावनेला प्रोस्ताहन देण्याचा हा दिवस आहे.

१ जानेवारी २०२५ च्या कुटुंब दिवसाची ( Global Family Day ) थिम काय आहे ?

“ एक जग एक कुटुंब- पिढ्यानपिढ्यांना एकत्र बांधणारा पूल ”

यावर्षाची थीम ही एकात्म आणि शांततापूर्ण जग निर्माण करण्यासाठी विविध समुदायांमधील पिढ्यांमधील अंतर भरून काढण्यासाठी आणि त्यांच्यातील भावबंधन वाढविण्यावर भर देण्यासाठी ही थिम ठरवण्यात आलेली आहे.

जागतिक कुटुंब दिनाचा ( Global Family Day ) इतिहास –

युनायटेड नेशन्स मिलेनियम चा एक भाग म्हणून १ जानेवारी २००० रोजी जागतिक कुटुंब दिन ( Global Family Day ) पहिल्यांदा साजरा करण्याची सुरुवात झाली. सकस समाजाची इमारत बांधण्यासाठी कुटुंब नावाचे दगड भक्कम असावेत यासाठी ‘कुटुंब’या संकल्पनेवर जास्त भर देऊन जगभरात शांतता आणि एकता वाढवणे हा यामागचा उद्देश होता.

स्टीव्ह डायमंड आणि रॉबर्ट ॲलन सिल्व्हरस्टीन यांच्या वन डे इन पीस या पुस्तकापासून प्रेरणा घेऊन हा दिवस ( Global Family Day ) साजरा केला जातो. शांततापूर्ण जगाचा पुरस्कार करण्यासाठी या दिवसाचा वापर केला जातो. २००० वर्षापासून सुरू करण्यात आलेल्या या दिवसाच्या संकल्पनेला आज परंपरा बनल्याचे दिसून येते. या परंपरेमुळे लोकांना सुसंवाद वाढवून आणि कौटुंबिक बंध मजबूत करून वर्षाची नवीन सुरुवात करण्यासाठी प्रोत्साहन मिळते. म्हणूनच या दिवसाचा जास्त प्रसार झाला पाहिजे. हा दिवस साजरा करण्यासाठी ज्याकाही नवनविन संकल्पना राबवल्या जातात त्यांना अवलंबल्या तर नक्कीच हा दिवस समाजासाठी फायदाचा ठरणारा आहे.

जागतिक कुटुंब दिनाचे महत्त्व – ( Global Family Day )

हा दिवस कुटुंबातील सुसंवाद घडवण्याचे एक महत्त्वाचे साधन आहे. हा दिवस ( Global Family Day ) साजरा केल्यामुळे लोकांना आपले नातेसंबंध जोपासण्यासाची, कौटुंबिक संबंध मजबूत करण्याची आणि जगतिक शांतता आणि समजूतदारपणाला प्रोत्साहन देण्यास मदत होते.

जागतिक कौटुंबिक दिवसाचे ( Global Family Day ) महत्त्वाचे मुद्‌दे.

  • एकता – विविध पार्श्वभूमीतील लोकांमध्ये सहकार्याला प्रोत्साहन देणे.
  • शांतता – अहिंसा आणि प्रेमाचा पुरस्कार करणे.
  • बंध – कुटुंबे आणि समुदायांमधील बंध मजबूत करण.

कुटुंब दिवस साजरा करण्यासाठीच्या काही कल्पना .

जागतिक कुटुंब दिन साजरा ( Global Family Day ) करण्यासाठी १ जानेवारी हा दिवस जरी निवडलेला असला तरी हा फक्त एक प्रतिकात्मक दिवस आहे. तुमचे कुटुंबतर तुमच्यासोबत कायम असते. त्यातील बंध वाढवण्यासाठी तुम्ही कधीही हा दिवस साजरा करू शकता. तो कसा साजरा करावा याच्या काही आयडिया मी तुम्हाला देते.

  • जवळच्या उद्यानांमध्ये कुटुंबांचे स्नेहमिलनाचे आयोजन करा. एकत्र कुटुंबासह एखाद्या सहलीला जा.
  • तुमच्या कुटुंबासह सिनेमा, नाटकाला जा.
  • एकत्र मिळून स्वयंपाक करा. आणि त्या जेवणाचा एकत्र आनंद घ्या.
  • कुटुंबाच्या फोटोंचे स्क्रॅपबुक बनवा.
  • कुटुंबासह घराच्या आजपास झाडे लावा.
  • स्थानिक धर्मादाय संस्थेत किंवा सामाजिक संस्थेत जाऊन एकत्र दिवस घालवा.
  • एकत्र ट्रेकिंगला जा.
  • एकमेकांना कृतज्ञतापूर्ण पत्रे लिहा. ते एकमेकांना द्या.
  • एखादा मैदानी खेळ अथवा बैंठ्या खेळांचे आयोजन करा. कुटुंबामधील सदस्यांमध्ये त्याच्या स्पर्धा लावा.
  • गाण्यांच्या भेंड्या लावा.
  • घरातील टिव्हीवर चित्रपट लावून, स्नॅक्सचे आयोजन करा.

अशाप्रकारे आपले स्वतःचे कुटुंब आणि समाजातील इतर समुदायांसोबत हा दिवस साजरा करून आपण आपापसातील प्रेम, सहकार्य आणि दयाळूपणाची भावना दृढ करून एका निकोप समाजासाठी नक्कीच हातभार लावू शकतो.

ज्योती भालेराव.

This post was last modified on January 2, 2025 1:27 am

Sponsored
Jyoti Bhalerao:

View Comments (2)

  • Ive read several just right stuff here Certainly price bookmarking for revisiting I wonder how a lot effort you place to create this kind of great informative website

  • I have been surfing online more than 3 hours today yet I never found any interesting article like yours It is pretty worth enough for me In my opinion if all web owners and bloggers made good content as you did the web will be much more useful than ever before

Sponsored

This website uses cookies.

Sponsored