Translate :

Sponsored

Girish Mahajan Big Claim On Eknath Khadase : गिरीश महाजानांचा एकनाथ खडसेंविषयीचा मोठा दावा, मुलाच्या मृत्यूप्रकरणी केला खळबळजनक आरोप .

Girish Mahajan VS Eknath Khadase : एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर बरेच आरोप केले होते. त्यावर उत्तर देताना आता, गिरीश महाजन यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन खडसे यांच्या आरोपांना खळबळजनक आरोप करत प्रत्युत्तर दिले आहे. 

मुंबई : 21/07/2025

हनी ट्रॅप प्रकरणात प्रफुल्ल लोढा या व्यक्तीचे नाव समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. यात माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी प्रफुल्ल लोढा आणि मंत्री गिरीश महाजन यांचे जवळचे संबंध आहेत, असा दावा केलाय. तसेच या हनी ट्रॅप प्रकणाची एसआयटी चौकशी करायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. असे असतानाच आता गिरीश महाजन यांनी खडसे यांच्या मुलाच्या निधनाबाबत खळबळजनक विधान करून , खडसेंवर गंभिर आरोप केले आहेत. 

महाजनांनी काय आरोप केले आहेत खडसेंवर ?( Girish Mahajan VS Eknath Khadase)

खडसे यांनी प्रफुल्ल लोढा याचे नाव घेऊन गिरीश महाजन यांच्यावर केलेल्या आरोपानंतर महाजन यांनी पत्रकार परिषद घेत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. यावेळी प्रफुल्ल लोढा याचेच नाव घेत एकनाथ खडसे यांच्या मुलाच्या मृत्यूबाबत मोठा दावा केला आहे. खडसे यांच्याबद्दल काय बोलावं. त्यांना सर्वदूर अपयश आलेलं आहे.  ते सत्तेपासून दूर फेकले गेले आहेत. भाजपमध्ये येण्यासाठी त्यांनी लोटागंण घातले. मात्र त्यांना कोणीही घेतले नाही, अशी खोटक टीका गिरिश महाजन यांनी केली. 

निखिल खडसेंच्या मृत्यूचा संदर्भ  (Girish Mahajan VS Eknath Khadase)

सर्व आजारपण आणि सर्वदूर अपयश यामुळे हा माणूस द्वेष भावनेने पछाडलेला आहे. थोडा वेळ द्याल तर मी एकनाथ खडसे यांच्यासोबतचे प्रफुल्ल लोढा यांचेसुद्धा फोटो दाखवतो. त्यामुळे एकनाथ खडसे यांची मानसिकता खराबच झालेली आहे, असा हल्लाबोल महाजन यांनी केला, निखिल खडसे यांनी ज्यावेळी आत्महत्या केली, त्यावेळी हाच प्रफुल्ल लोढा बोलला होता. काय काय बरळला होताय आता खडसे म्हणतात प्रफुल्ल लोढा याची एसआयटी चौकशी करा, असे असेल तर निखिल खडसे यांच्या मृत्यूप्रकरणाचीही चौकशी मागणी प्रफुल्ल लोढा याने केली होती, असा संदर्भ महाजन यांनी यावेळी दिला. 

खडसेंच्या मुलाच्या मृत्यूचं कारण समोर यायला हवे  (Girish Mahajan VS Eknath Khadase )

एकनाथ खडसे यांच्या मुलाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला होता, हे समोर आलं पाहिजे. खडसेंनीच त्यांच्या मुलाचा खून केला म्हणून असं लोढा यांनी सांगितलेलं आहे. असा मोठा आणि गंभीर गौप्यस्फोट महाजन यांनी पत्रकार परिषदेत केला. त्यावेळी मी एकनाथ खडसे यांच्यासोबतच रहात होतो. मला त्याबद्दल बोलायचे नाही. मी त्या लेव्हलचा माणून नाही. पण त्यांनी बोलताना थोडं तारतम्य बाळगलं पाहिजे. असा सल्लाही गिरिश महाजन यांनी खडसे यांना दिला. 

हिंमत असेल तर चौकशी करा – खडसेंचे आव्हान (Girish Mahajan VS Eknath Khadase )

महाजन यांच्या गौप्यस्फोटानंतर, खडसेंनीही आव्हान दिले आहे. ते म्हणाले, नेहमी माझ्या मुलाच्या मृत्यूवरून कसले इशारे देता. मी कसल्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहे. तुमच्यात दम असेल तर चौकशी करा, असे खुले आव्हान एकनाथ खडसे यांनी महाजन यांना दिले आहे. मुलगा गेल्याचं दुःख मलाही आहे.त्यात घातपात असा काहीही नव्हता, असं त्यावेळी पोलिसांनी केलेल्या तपासातून समोर आलेलं आहे. मग प्रत्येक वेळी मुलाच्या मृत्यूवरून कसली विधानं करताय, असा प्रश्न खडसें यांनी केला आहे. मलाही तुमच्या घरातील बऱ्याच गोष्टी माहित आहे, मीही बोलू शकतो, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. 

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored