Translate :

Sponsored

Ghatkoper Cylinder Blast : घाटकोपर येथे सिलिंडरचा स्फोट, चारजण जखमी : Cylinder Blast In Ghatkoper, Four People Injured.

घाटकोपरमध्ये सिलिंडरचा स्फोट, चारजण जखमी (छायाचित्र प्रतिकात्मक साभार सोशलमीडिया)

Ghatkoper Cylinder Blast  : घाटकोपरमध्ये एका सिलिंडरचा स्फोट झाला आहे. एका इमारतीच्या शेजारी ही घटना घडली. सविस्तर घटना काय ते जाणून घेऊ.

मुंबई : 30/09/2025

घाटकोपरच्या एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या शेजारी एक दुर्दैवी घटना घडली आहे. या इमारतीच्या शेजारी कामगारांसाठी बांधलेल्या तात्पुरत्या शेडमध्ये सिलिंडरचा स्फोट झाला आहे. मंगळवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास ही घडली आहे. कामगारांसाठी बांधलेल्या तात्पुरत्या शेडमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट (Ghatkoper Cylinder Blast) झाल्याने चारजण गंभीर जखमी झाल्याची घटना घाटकोपर येथील नीलधारा इमारत परिसरात घडली आहे. या घटनेत जखमी झालेल्या चौघा जणांना राजावाडी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने परिसरात हळहळ आणि भिती निर्माण झाली आहे. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले आहे. जखमी झालेल्या चौघांपैकी दोघेजण 60 ते 70 टक्के भाजल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

घाटकोपरमधील घटना  (Ghatkoper Cylinder Blast )

घाटकोपर पूर्वेकडील विद्यानिकेतन कॉलेजजवळ 60 फूट रस्ता, जैनमंदिराच्या समोर ‘नीलधारा’ या बांधकाम सुरू असलेल्या सात मजली इमारतीजवळ कामगारांसाठी बांधलेल्या तात्पुरत्या शेडमध्ये मंगळवारी रात्री गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की, संपूर्ण परिसरात भीती निर्माण झाली होती. या स्फोटाने लागलेल्या आगीत चारजण जखमी झाले आहेत. त्यांना नजीकच्या राजावाढी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कितीजण जखमी ?  (Ghatkoper Cylinder Blast)

या अपघातात चारजण गंभीर जखमी झाले आहे. त्यांना तातडीने राजावाडी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेत घनश्याम यादव (36), देवेंद्र पाल (26), यांना 60 ते 70 भाजल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. महेंद्र चौधरी (32) यांना 10 ते 12 टक्के भाजले आहे. तर संदिप पाल (20) यांना 5 टक्के भाजले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

राजावाडी रूग्णालयात दाखल करण्यात आलेल्यांची नावे (Ghatkoper Cylinder Blast)

  • 1 .घनश्याम यादव (36)
  • 2 . देवेंद्र पाल ( 26 )
  • 3 . महेंद्र चौधरी ( 32 )
  • 4 . संदिप पाल ( 20 )

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored