Konkan Train Reservation For Ganpati Festivel : दरवर्षी मुंबईचे चाकरमानी गणपती उत्सवासाठी कोकणाकडे धाव घेतात. त्यासाठी त्यांना अजूनही रेल्वेचाच उत्तम पर्याय आहे. त्यांच्यासाठी खुषखबर आहे. कोकणातील नियमित गाड्यांच्या आरक्षणाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.
मुंबई : 2025-06-19
गणपती बाप्पाच्या आगमनासाठी प्रत्येकजण उत्सूक असतो. कोकणवासीयांसाठी तर हा एक खास सण आहे. मुंबईत कामानिमित्ताने रहाणाऱ्यांना गणपतीत गावी जाण्याची ओढ असते. यंदा गणपती बाप्पाचे आगमन बुधवारी दिनांक 27 ऑगस्ट 2025 ला होणार आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्यांसाठी रेल्वे गाड्यांचे आऱक्षण (Konkan Train Reservation) किमान 60 दिवस आधी करावे लागणार आहे. कोकण रेल्वेच्या नियमित गाड्यांचे आरक्षण आता गणेश चतुर्थीच्या दिवस पाहून साधारण 23 जूनपासून सुरू करावे लागणार आहे. तरीही गणेश चतुर्थीच्या आधी दोन दिवस चाकरमानी कोकणात जातात. 25 आणि 26 ऑगस्टला कोकणात पोहोचण्यासाठी त्या दिवसांच्या गाड्यांचे आरक्षणाला जादा मागणी असणार आहे.
यावर्षीच्या 60 दिवस आधी आगाऊ आरक्षणाच्या तारखांचा तक्ता खालील प्रमाणे आहे. यावर्षीही मध्य रेल्वे कोकण मार्गावर स्पेशल गाड्यांना सोडणार आहे. या शिवाय एसटी महामंडळाने देखील 2000 हून अधिक जादा बसगा्डयांची सोय केली आहे.
रेल्वे आरक्षण दिवस यादी
| आरक्षण दिनांक | प्रवास दिनांक |
| 23 जून, सोमवार | 22 ऑगस्ट, शुक्रवार |
| 24 जून, मंगळवार | 23 ऑगस्ट, शनिवार |
| 25 जून, बुधवार | 24 ऑगस्ट, रविवार |
| 26 जून, गुरूवार | 25 ऑगस्ट, सोमवार |
| 27 जून,शुक्रवार | 26 ऑगस्ट, मंगळवार |
| 28 जून, शनिवार | 27 ऑगस्ट, बुधवार- श्री गणेश चतुर्थी |
| 29 जून, रविवार | 28 ऑगस्ट, गुरूवार -ऋषी पंचमी |
| 30जून,सोमवार | 29 ऑगस्ट, शुक्रवार |
| 01 जूलै, मंगळवार | 30 ऑगस्ट, शनिवार |
| 02 जूलै,बुधवार | 31 ऑगस्ट, रविवार,गौरी आगमन |
| 03 जूलै,गुरूवार | 01 सप्टेंबर, सोमवार, गौरी पूजन |
| 04,शुक्रवार | 02 सप्टेंबर, मंगळवार, गौरी गणपती |
कोकणात जाण्यासाठी रेल्वे गाड्यांना प्रचंड गर्दी असते. कोकण मार्गावरील नियमित गाड्यांच्या आरक्षणाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. रेल्वेच्या नियमाप्रमाणे 60 दिवसांआधी बुकिंग साधारण 23 जूनपासून सुरू होत आहे. या गाड्यांना प्रचंड गर्दी असल्याने मध्ये रेल्वे कोकण मार्गावर अडीचशेहून अधिक गणपती स्पेशल गाड्यांना सोडते. मुंबई-गोवा महामार्गाचे काम अजूनही सुरू असल्याने, यंदाही कोकणवासीयांना रेल्वेचाच पर्याय जास्त योग्य ठरणारा आहे.