Translate :

Sponsored

गणेश चतुर्थी 2025 : एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यासांठी एसटीकडून मोठी घोषणा : Ganesh Chaturthi 2025, Good News : MSRTC 5 Thousands Extra Buses For Kokan, Ganeshotsav celebretion

Ganesh chaturthi 2025 : गणेशोस्तवासाठी आपल्या घरी जाण्यासाठी बाहेरगावी नोकरी-धंदा करणारे सर्वजणच उत्सूक असतात. आता त्यांच्या आनंदात एसटी महामंडळाने आणखी भर घातली आहे. 

मुंबई : 15/07/2025

महाराष्ट्राचा सर्वात लाडका उत्सव म्हणजे गणेश उत्सव (Ganesh chaturthi 2025) होय. त्यासाठी आता काही दिवसांचा अवधी उरला आहे. गणरायाच्या आगमानाची चाहुल लागताच, बाहेरगावी नोकरी करणाऱ्यांना आपल्या गावी परतण्याचे वेध लागतात. कोकणवासीयांसाठी तर गणेसोत्सव खास मानला जातो. या कोकणवासियांलाठी एसटी महामंडळाने मोठी खुषखबर जाहीर केली आहे. गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळाने मोठी जय्यत तयारी केल्याते दिसून येत आहे. येत्या 27 ऑगस्टला गणपती बाप्पाचे आगमन होत आहे. त्यासाठी 23 ऑगस्ट ते 27 सप्टेंबर या कालावधीत एसटी बस उपलब्ध असणार आहेत. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली आहे. 

सुमारे 5 हजार बस गणेशोत्सवासाठी धावणार  (Ganesh chaturthi 2025)

नुकतेच एसटी महामंडळाची एक बैठक मंत्रायलयात पार पडली. या बैठकीत महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह एसटीचे सर्व खातेप्रमुख उपस्थित होते. या बैठकीत प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. गणपती उत्सव हा कोकणच्या चाकरमान्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. गणपती बाप्पा, कोकणचा चाकरमानी आणि एसटी यांचे एक अतूट नाते आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी महामंडळ नफा-तोट्याचा विचार न करता काम करते. यावर्षी सुमारे 5 हजार जास्तीच्या बस कोकणाकडे धावणार आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी या बसेसचे आरक्षण एसटीच्या अधिकृत संकेतस्थळावर npublic.msrtcors.com वर उपलब्ध आहे. याशिवाय बसस्थानकांवरून किंवा MSRTC Bus Reservation ॲपद्वारे देखील आरक्षण करता येणार आहे. 

22 जुलैपासून आरक्षण करता येणार (Ganesh chaturthi 2025)

नुकताच आषाढी एकादशीचा उत्सव पार पडला. त्यासाठी एसटी महामंडळाकडून 5,200 जास्तीच्या बस पंढरपूरसाठी सोडल्या होत्या. भाविकांनी त्याला उदंड प्रतिसाद दिला. या प्रतिसादामुळेच आता एसटी महामंडळाकडून गणेशोत्सवासाठी (Ganesh chaturthi 2025) 5 हजार जास्तीच्या बस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे या बससाठी व्यक्तिगत आरक्षणासह गट आरक्षणाची सोयही असणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अमृत ज्येष्ठ नागरिकांनी 100 टक्के तिकिट दरात सवलत दिली आहे, तर ज्येष्ठ नागरिकांना आणि महिलांना 50 टक्के तिकिट दरात सवलत दिली जाणार आहे. गट आरक्षणाची प्रक्रिया 22 जुलैपासून सुरू होत आहे. 

वाहनदुरूस्ती पथकंही तैनात (Ganesh chaturthi 2025)

येत्या 23 जुलै ऑगस्टपासून मुंबई, ठाणे, पालघर या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून जादा बसेस कोकणासाठी सुटणार आहेत. गेल्या वर्षी 4 हजार 300 बस सोडण्यात आल्या होत्या. त्या तुलनेत यावर्षी 700 बस जास्त सोडण्यात येणार आहेत. गणेसोत्सवासाठी (Ganesh chaturthi 2025) एसटीची वाहतूक सुरळीत चालावी यासाठी बसस्थानके आणि बसथांब्यांवर एसटीचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. कोकणमहामार्गांवर ठिकठिकाणी वाहनदुरूस्ती पथके (ब्रेकडाऊन व्हॅन) तैनात असणार आहे. या सगळ्या तयारीमुळे प्रवाशांना कोणताही त्रास होणार नाही, असेही प्रताप सरनाईक यांनी सांगितले आहे. 

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored