Translate :

Sponsored

FSSAI Action Bisleri, Big News, 2026 : एफएसएसएआय ची ‘बिसलेरी’वर कारवाई, गुन्हा दाखल, पाण्यात आढळले कॅन्सरला कारणीभूत घटक : Bisleri Water Samples Fail Quality Tests Bromoate

एफएसएसएआय ची 'बिसलेरी'वर कारवाई, गुन्हा दाखल, पाण्यात आढळले कॅन्सरला कारणीभूत घटक.

FSSAI Action Bisleri : देशातील प्रसिद्ध पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी ‘बिस्लेरी’ च्या पाण्याचे नमुने सलग दोनदा गुणवत्ता चाचणीत नापास झाल्यानंतर हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी ‘बिस्लेरी’ विरोधात अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (FSSAI) मोठी कारवाई करण्याची मंजुरी दिली आहे.

दिल्ली : 23-11-2026

देशातील सर्वात मोठी पाणी कंपनी असलेल्या बिस्लेरीवर (FSSAI Action Bisleri) मोठी कारवाई कऱण्यात आली आहेय अन्न सुरक्षेसाठी जबाबदार असलेली सरकारी संस्था, FSSAI ने, बिस्लेरीच्या पाण्याच्या नमुन्यांची दोनदा चाचणी अयशस्वी झाल्यानंतर कंपनीविरूद्ध गुन्हा दाखल कऱण्यास मंजुरी दिली. म्हणजेच बिस्लरीचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे आढळले आहे.

पहिल्या चाचणीत पाण्यात ब्रोमेटची पातळी परवानगी असेलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे आढळून आले, जे आरोग्यासाठी धोकादायक मानले जाते. कंपनीने यावर आक्षेप घेतला आणि दुसरी चाचणी घेण्यात आली, परंतु त्यातही पाणी असुरक्षित आढळले. यावेळी PAHs नावाचे कर्करोगास कारणीभूत घटक देखील आढळले. विशेष म्हणजे, पाण्याचे नमुने बाजारातून नव्हे, तर बिस्लेरीच्या आवारातून गोळा करण्यात आले होते, असेही सांगण्यात आले आहे.

एफएसएसएआयने काय सांगितले ?  (FSSAI Action Bisleri)

बिस्लेरीवर केलेल्या कारवाईबाबत, एफएसएसआयने दिलेल्या माहितीनुसार,, ब्रोमेट आणि PAHs दोन्ही कर्करोगास कारणीभूत पदार्थ म्हणून वर्गीकृत केले जातात. हे पाणी पिण्यास अयोग्य असून अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2006 अतंर्गत कंपनीवर गुन्हा दाखल केला जाईल. कंपनीने अद्याप यावर प्रतिसाद दिलेला नाही.

50 वर्षांहून अधिक जुन्या या ब्रँडवरील कारवाईने लोकांना आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. एफएसएसएआयने केवळ बिस्लेरीवरच नव्हे, तर इतर कंपन्यांवरही कारवाई केली आहे. एफएसएसएआयने वसंत मसाला प्रायव्हेट लिमिटेड, टिट-बिट फूडस इंडिया प्रायव्हेट लिमिटे़ड, मीमांसा इंडस्ट्रीज आणि आशा कन्फेक्शनरी यांसारख्या इतर अन्न कंपन्यांवरही गन्हे दाखल केले आहेत आणि उत्पादने परत मागवण्याचे आदेश जाहीर केले आहेत.

अनेक कंपन्यांचे परवाने निलंबित  (FSSAI Action Bisleri)

एफएसएसएयाने नियमांचे पालन न केल्यामुळे उर्मी लाइफसायन्सेस आणि गौर आयुर्वेदिक स्टोअर्स यांचे परवाने निलंबित केले आहेत. एफएसएसएआयने अशा कन्फेक्शनरीविरूद्ध उत्पादन परत मागवण्याचा आदेश जारी केला असून, कंपनीला तिची पॅकबंद चॉकलेट भरलेली बिस्किटे असुरक्षित आढळल्यानंतर ती परत मागवण्याचे निर्देश दिले आहेत.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored