Translate :

Sponsored

French Open 2025, Coco Gauff Won the Trophy : कोको गॉफ फ्रेंच ओपनची नवी चॅम्पियन, आर्यना सबालेंकोवर केली मात.

French Open 2025, Coco Gauff Won the Trophy : कोको गॉफ ठरली फ्रेंच ओपन 2025 ची विजेती. तिने वयाच्या 21 व्या वर्षी फ्रेंच ओपन या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत विजय मिळवून इतिहास घडवला आहे. कोकोने याआधी 2022 यावर्षी अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र तेव्हा तिला अपयशाचा सामाना करावा लागला होता.मात्र यावर्षी तिने यशाला गवसणी घातली आहे. 

क्रीडा : 2025-06-08

क्रीडा विश्वात नेहमीच अविश्वसनीय वाटणाऱ्या मात्र सत्यात उतरणाऱ्या घटना घडत असतात. सध्या अशीच एक बातमी आहे. जिने स्वप्न पहाणे आणि ते सत्यात उतरवणे म्हणजे काय हे समजते. फ्रेंच ओपन टेनिस ही मानाची स्पर्धा आहे. या स्पर्धेत यावर्षी कोको गॉफ  (Coco Gauff)  हिने फ्रेंच ओपन 2025 या स्पर्धेत अजिंक्यपद मिळवत इतिहास घडवला आहे. कोको गॉफ हिने रोलँड गॅरोसमधील फिलिप चॅटियर टेनिस कोर्टवर खेळवण्यात आलेल्या या महामुकाबल्यात बेलारूसच्या आर्यना सबालेंकाचाच धुव्वा उडवला आहे. कोकोने आर्यनचा एकुण 2 तास 38 मिनीटं रंगलेल्या समान्यात 6-7 (5), 6-1, 6-4 अशा फरकाने पराभव केला. कोकोची फ्रेंच चॅम्पियन होण्याची ही पहिलीच वेळ आहे. 

कोको गॉफचं दुसरं ग्रँड स्लॅम विजेतेपद

आर्यना सबार्लेका आणि कोको गॉफ( Coco Gauff )यांच्यातील झालेला पहिला सेट फार उत्कंठावर्धक असा राहिला. दोघींनीही एकमेकांची सर्व्हिस तब्बल चार वेळा ब्रेक केली. त्यामुळे पहिला सेट टायब्रेकरमध्ये गेला. टायब्रेकरमध्ये सबालेंकाने बाजी मारली. त्यानंतर गॉफने दुसऱ्या सेटमध्ये दणक्यात कमबॅक केलं. गॉफने दुसरा सेट आपल्या नावावर केला. सबालेंका हीने तिसऱ्या सेटमध्येच हार मानली होती. सबालेंका थकली असल्याने तिने गॉफसमोर गुडघे टेकले. 

कोको गॉफ हीने 20222 मध्ये फ्रेंच ओपनच्या फायनलपर्यंत धडक मारली होती. कोको तेव्हा चॅम्पियन होण्यापासून एक पाऊल दूर राहिली. तेव्हा कोकोवर इगा स्विएटेक हीने मात करत तिची विजयी घौडदौड रोखली होती. गॉफच्या कारकिर्दीतील यंदांचं हे दुसरं ग्रँड स्लॅम एकेरी विजेतेपद ठरलं. गॉफने याआधी 2023 मध्ये युएस ओपनमध्ये बाजी मारली होती. तर दुसऱ्या बाजूला आर्यना सबालेंका ही पहिल्यांदाच फ्रेंच ओपनच्या फायनलपर्यंत पोहोचली होती. सबालेंका हीने 2023 आणि 2024 मध्ये ऑस्ट्रिलियन ओपनमध्ये विजेतेपद पटकावले आहे. तिने 2024 मध्ये युएस ओपनमध्येही विजय मिळवला होता. 

रविवारी पुरूषांमध्ये रंगणार अंतिम सामना

रविवारी 8 जून ला मेन्स सिंगल फायनलमध्ये जॅनिक सिन्नेर विरूद्ध स्पेनचा कार्लेस अल्कराज आमनेसामने असणार आहे. जॅनिक सिन्नेर वर्ल्ड रॅंकिंगमध्ये पहिल्या स्थानी आहे. तर कार्लोस अल्कराज दुसऱ्या स्थानी आहे. अल्कराज याने गेल्यावर्षीच्या फ्रेंच ओपनचं विजेतेपद पटकावलं होतं. त्यामुळे त्याच्यासमोर विजेतेपद टिकवून ठेवण्याचे आवाहन असणार आहे. तर दुसरीकडे जॅनिक सिन्नेर याचा पहिल्यांदा फ्रेंच ओपन ट्रॉफी पटकावण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे हा समाना रंजक ठरणार आहे. 

कोको गॉफचं मिशेल ओबामा यांनीही अभिनंदन केले आहे. 

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored