Translate :

Sponsored

Four Star Of Destiny Book, Big News : जनरल नरवणे यांच्या पुस्तकावरून पेटलाय वाद ! असं काय आहे या पुस्तकात ? : Former Army Cheif Manoj Mukund Naravane Four Stars of Destiny Book Controversy

जनरल नरवणे यांच्या पुस्तकावरून पेटलाय वाद !

Four Star Of Destiny Book : माजी सेनाप्रमुख जनरल  मनोज मुकुंद नरवणे यांचे फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी नावाचे आत्मकथन वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. राहुल गांधी संसंदेमध्ये त्याचा उल्लेख केल्याचे वाद निर्माण झाला आहे. काय आहे हे प्रकरण जाणून घेऊ.

नवी दिल्ली : 02-02-2026

सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. आज विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे लोकसभेमध्ये बोलणार होते. मात्र त्यापूर्वीच संसदेमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. राहुल गांधी यांनी संसदेमध्ये एका न प्रकाशित झालेल्या पुस्तकाचा ( Four Star Of Destiny Book ) उल्लेख केल्यामुळे सत्ताधारी नेते आक्रमक झाले आहेत. पूर्व सेनाप्रमुख जनरल मनोज मुकूंद नरवणे यांचे फोर स्टार्स ऑफ डोस्टिनी नावाचे आत्मकथन लिहिले आहे. मात्र हे पुस्तक अद्याप प्रकाशित झाले नाही. याचा उल्लेख राहुल गांधींनी करताच केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आक्रमक भूमिका घेतली.

मनोज नरवणे यांचे धक्कादायक खुलासे  ( Four Star Of Destiny Book )

मनोज मुकुंद नरवणे हे माजी सेनाप्रमुख असून त्यांच्या आत्मकथनामध्ये अनेक धक्कादायक दावे करण्यात आले आहेत. नरवणे यांच्या पुस्तकामध्ये देशाच्या संवेदनशील सैन्य कारवाई आणि त्यामागील राजकीय हालचाली याबाबत उल्लेख कऱण्यात आल्याची शक्यता आहे. अद्याप हे पु्स्तक प्रकाशनाच्या कचाट्यामध्ये अडकले आहे. काही महिन्यांपूर्वी या पुस्तकातील काही भाग व्हायरल झाला होता. त्याचबरोबर अग्नीवीर योजनेबाबत देखील अनेक दावे कऱण्यात आले होते.

2020 साली गलवान क्षेत्रामध्ये चीनी सैनिकांकडून आक्रमण करण्यात आले होते. चीनी सैनिकांनी भारतीय सैनिकांवर हल्ला केला होता. यावेळी मनोज मुकूंद नरवणे हे सेनाप्रमुख होते. त्यांनी पुस्तकामध्ये या घटनांचा उल्लेख केला आहे. या पुस्तकाच 31 ऑगस्ट 2020 च्या रात्री, ज्या दिवसी चीनी सैन्याने लडाखमधील रेचिन ला खिंडीतून घुसखोरी केली होती, त्या दिवशी नरवणे आणि तत्कालीन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यात झालेल्या चर्चेचे वर्णन केले आहे. पुस्तकात असे म्हटले आहे की जेव्हा राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याबद्दल माहिती दिली तेव्हा मोदींनी त्यांना ” तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा” असे निर्देश दिले.

‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ पुस्तकाचा वाद  (Four Star Of Destiny Book )

माजी सेनाप्रमुख नरवणे यांच्या कार्यकाळात, जून 2022 मध्ये, देशात अग्निवीर योजना लागू करण्यात आली. अग्निवीर योजनेअंतर्गत भरती होणाऱ्या 75 % तरूणांना कायम ठेवण्याचा प्रस्ताव लष्कराने ठेवला असला तरी, सरकारने तो 25 % पर्यंत कमी केला. शिवाय, या सैनिकांना फक्त 20,000 रुपये वेतन दिले जात होते, परंतु नंतर ते वाढवून 30,000 रुपये करण्यात आले. याबाबत देखील त्यांनी फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी या पुस्तकामध्ये लिहिले असल्याची शक्यता आहे.

या पुस्तकाचा उल्लेख करून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी चीनीच्या घुसखोरीवरून संसदेमध्ये प्रश्न उपस्थित केले. चीनने भारताच्या हद्दीमध्ये चार तळ ठोकले असून कैलास पर्वतावर देखील आक्रमक केल्याचे राहुल गांधी म्हणाले आहेत. दरम्यान राहुल गांधी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणादरम्यान संसदेत चीनचा आणि डोकलामचा मुद्दा उपस्थित केला आहे. संसदेमध्ये माजी सेनाप्रमुख नरवणे यांच्या प्रकाशित न झालेल्या पुस्तकाचा संदर्भ देत राहुल गांधींनी संरक्षण मंत्री आणि पंतप्रधानांचा उल्लेख केला. यामुळे लोकसभेमध्ये मोठा गदारोळ झाला. या प्रकरणामुळे लोकसभेचे कामकाज तीन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored