Translate :

Sponsored

Food And Civil Supply department Goes to Chhagan Bhujbal : छगन भूजबळ यांच्याकडे सोपवले अन्न आणि नागरी पुरवठा खाते.

छगन भुजबळ  ( Chhagan Bhujbal ) यांच्याकडे धनंजय यांचे अन्न आणि नागरी पुरवठा खाते (Food And Civil Supply department ) सोपवण्यात आले आहे. चार दिवसांपूर्वीच त्यांना मुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात समील करून घेण्यात आले होते. 

नागपूर : 2025-05-23

महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात सामील झाल्यानंतर चार दिवसांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे (एनसीपी) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal )यांना शुक्रवारी अन्न आणि नागरी पुरवठा खाते ( Food And Civil Supply department ) देण्यात आले आहे. याआधीही त्यांनी या विभागाचा कार्यभार संभाळलेला आहे. माझ्याकडे भारतीय जनता पार्टीच्या महायुती सरकारने अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचे कामकाज सुपूर्त केले आहे. 

यावर्षीच्या मार्चमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे नेते धनंजय मुंडे यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर, या खात्यासाठी कोणालाही नेमले नव्हते. नाशिक जिल्ह्याच्या येवला विधानसभा मतदार संघातून अनेकवेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या छगन भूजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी 20 मे ला मंत्रीपदाची शपथ घेतली. मागच्या वर्षी डिसेंबर मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्रीपद दिले गेले नव्हते. म्हणून भूजबळ नाराज होते. 

भूजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना सांगितले की, काही लोकं उगाचच काहीही बोलत आहेत, पण मी भाजपाचा नाही तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचाच मंत्री आहे. पक्ष ठरवतो की, कोणाला मंत्रीपद द्यायचे. मुख्यमंत्री तर फक्त सल्ला देतात. महायुतीमध्ये भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सहभागी आहे. हे खरे आहे की, पहिल्या कॅबिनेट विस्तार मध्ये फडवीस यांनी मला मंत्रीमंडळात सहभागी करून घेण्यासाठी खुप प्रयत्न केले होते, मात्र तेव्हा ते होऊ शकले नव्हते. 

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored