National Defence Acadamy : आजचा दिवस भारताच्या महिलांसाठी ऐतिहासिक ठरला. एनडीएच्या खडतर प्रशिक्षणाचा टप्पा पार करून देशाच्या मुली देशसेवेसाठी सज्ज झाल्या आहेत. माजी लष्करप्रमुख आणि मिझोरामचे राज्यपाल व्हि.के.सिंग यांच्याकडून या संचलनाची पाहणी करण्यात आली. त्यानंतर हा समारंभ पार पडला.
पुणे : 2025-05-30
पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे (एनडीए) आज (30 मे ) ला दिक्षांत संचलन (पासिंग आऊट परेड ) पार पडले. यावेळचे हे 148 व्या तुकडीचे संचलन होते. हे एनडीएमधील महिला छात्रांनी केलेले ऐतिहासिक संचलन असून, महिलांची पहिली तुकडी यावर्षी उत्तीर्ण होऊन बाहेर पडली आहे. त्यांमुळे संपूर्ण देशासाठीच हा ऐतिहासिक दिवस म्हणता येईल. या समारंभासाठी माजी लष्कर प्रमुख आणि मिझारोमचे राज्यपाल व्हि.के.सिंग यांच्याकडून या संचलनाची पाहणी करण्यात आली.
या समारंभाच्या प्रसंगी जनलक व्हि.के सिंग यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या छात्रांना पदक प्रदान करण्यात आले. तसेच यावेळी त्यांनी महिला छात्रांना मार्गदर्शनही केले.
व्हि.के.सिंग म्हणाले की,
आज अकादमीच्या इतिहासात एक अनोखा आणि महत्त्वाचा दिवस आहे. आज एनडीएमधून महिला छात्रांची पहिली तुकडी उत्तीर्ण झाली आहे. हा आमच्या प्रवासातील एक ऐतिहासिक टप्पा म्हणता येईल. जो सर्वसमावेशकता आमि सक्षणीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या तरूणी ‘नारी शक्ती’चे प्रतीक आहेत. ज्या केवळ महिला विकासाचेच नव्हे तर महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाचे प्रतीक आहेत.
पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीतील (एनडीए) 148 व्या तुकडीमध्ये महिला छात्रांनी तीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण पुर्ण केले. आता त्या देशसेवेसाठी सज्ज झाल्या आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने 2021 मध्ये दिलेल्या निर्णयानुसार महिलांना एनडीए मध्ये प्रवेश देण्यास सुरूवात झाली. त्यानंतर 2022 पासून प्रवेश प्रक्रिया मुलींसाठी सुरू करण्यात आली होती. त्यात पात्र ठरलेल्या महिला छात्रांना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधीनी मध्ये प्रवेश देण्यात आले. 2022 ते 2025 असे तिन वर्षांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून आता या महिला छात्रा देशसेवेसाठी सज्ज झाल्या आहेत.