Translate :

Sponsored

Farmers Relief Package, Big News For Farmers : शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीआधी रक्कम होणार जमा, उपमुख्यमंत्री शिंदेंची घोषणा, बळीराजाला दिवाळीत दिलासा ! : Eknath Shinde Said Maharashtra Farmers Will Receive A Relief Package Before Diwali

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवाळी आधी शेतकऱ्यांना मदत मिळणार असल्याचे जाहीर केले आहे.

Farmers Relief Package : महाराष्ट्रात यावर्षी अतिवृष्टीमुळे आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची दिवाळी कशी जाणार ही चिंता होती.मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवाळीआधी शेतकऱ्यांसाठी 32 हजार करोड रूपयांचे पॅकेज जाहीर केले आहे.

पुणे  : 13/10/2025

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील आयोजित एका कार्यक्रमात शेतकरी आणि कायदा-व्यवस्था या संबंधी प्रश्नांशी निगडीत मुद्यांवर चर्चा केली. त्यांनी म्हटले आहे की, राज्य शासनाने शेतकऱ्यांना (Farmers Relief Package)  दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली आहे. दिवाळीच्या आधी त्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा होणार आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, 32 हजार करोड रुपये पॅकेज (Farmers Relief Package)  घोषित केेले आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्यता होणार आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, शेतकऱ्यांची दिवाळी आम्ही अंधारात होऊ देणार नाही. आम्ही जो शब्द दिला होता, तो आम्ही पाळला आहे. शेतकऱ्यांना आम्ही असेच वाऱ्यावर सोडणार नाही.

धंगेकर प्रकरणावर काय म्हणाले शिंदे  (Farmers Relief Package)

उपमुख्यमंत्र्यांनी पुण्याचे शिंदे शिवसेना गटाचे नेते रविंद्र धंगेकर यांच्याविषयी सुद्धा आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले की, महायुतीमध्ये कोणत्याही प्रकारचा दंगा चालणार नाही. कायदा-सुव्यवस्था कायम राहीली पाहिजे आणि सामान्य जनता, गरीब जनता, महिला आणि लहान मुले यांना निर्भयपणे फिरता यायला हवे, हा त्यांचा अधिकार आहे. शिंदे म्हणाले की, कोणत्याही अपराध्याला माफी नाही. कोणीही असो तो, त्याला संरक्षण दिले जाणार नाही.

शिंदेंनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांशी यावेळी चर्चा केली आणि पुण्यातील वातावरण शांतता आणि गुन्हेमुक्त ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी सांगितले की, शहरात फक्त गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यात येणार नाही तर, सरकार आणि पोलीस प्रशासन दोन्ही मिळून जनतेच्या सुरक्षेसाठी कटीबद्ध रहाणार आहे. त्यांनी हेही स्पष्ट केले आहे की, पुण्यातील कायदा आणि व्यवस्था या दोन्हींचे रक्षण करणे हीच राज्य सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे.

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored