Translate :

Sponsored

Fake Divyang Certificate : राज्यातील बोगस दिव्यांग प्रमाणपत्रधारकांवर बसणार आळा, सचिव तुकाराम मुंडेचा मोठा निर्णय : Disabled Welfare Department Secretary Tukaram Munde On Fake Divyang Certificate

दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंडे.

Fake Divyang Certificate : महाराष्ट्रातील दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकारमा मुंडे यांनी राज्यातील दिव्यांगांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्यात त्यांनी सांगितले आहे की, जिल्हा परिषदे दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्राची कसून तपासणी केली जाणार आहे. या निर्णयाविषयी अधिक जाणून घेऊ.

छत्रपति संभाजीनगर : 24/09/2025

राज्याचे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी नुकताच एक निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदेच जे दिव्यांग कर्मचारी काम करतात त्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची (Fake Divyang Certificate) फेरतपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.

याबाबत, जिल्हा परिषदांमध्ये एक परिपत्रक देण्यात आले आहे. सोमवारी 22 सप्टेंबरला विविध विभागांमध्ये काम करणाऱ्या दिव्यांग कर्मचाऱ्यांची फेरतपासणी सुरू करण्यात आलेली आहे. जिल्हा परिषदेअंतर्गत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून ही माहीती मिळाली. राज्यात सर्वत्र बोगस विकलांग प्रमाणपत्रांचे ( Fake Divyang Certificate) प्रमाण वाढल्याचे निर्दशनास आले आहे. अनेकजण या बोगस प्रमाणपत्रांच्या आधारावर सरकारी नोकऱ्या आणि योजनांचा लाभ घेत आहे. हे प्रकार थांबण्यासाठी, सचिव तुकाराम मुंडे यांनी या विभागाचा कार्यभार स्विकारताच, सर्व जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांशी व्हिडियो कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून चर्चा केली.

या चर्चेदरम्यान त्यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र धारकांचा प्रश्न समूळ नष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत आता जिल्हा परिषदेने आपली कार्यवाही सुरू केली आहे. सर्व विभाग प्रमुखांना आपल्या विभागातील दिव्यांग कर्मचाऱ्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र तपासण्याचे आदेश दिले आहेत. यात शिक्षक, गैर-शिक्षण कर्मचारी आणि अन्य विभागांचा समावेश आहे.

अपात्र दिव्यांगांविरोधात होणार कठोर कारवाई  (Fake Divyang Certificate)

दिव्यांग प्रमाणपत्रांसाठी युडीआईडी कार्ड अनिवार्य असणार आहे, कमीतकमी 40 टक्के विगलांगता असणे आवश्यक आहे. 40 टक्क्यांपेक्षा कमी विगलांगता असताना जर कोणी याचा लाभ घेत असेल तर , कठोर कारवाई केली जाणार आहे. तपासाअंती जे कर्मचारी असे बोगस प्रमाणपत्र धारक आढळतील त्यांच्यावर त्वरीत कारवाई केली जाणार आहे.

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored