Translate :

Sponsored

Easter Sunday : इस्टर संडे : ख्रिश्चनांचा एक पवित्र दिवस

04/20/2025 :

जगभरातील ख्रिश्चन बांधवांसाठी ख्रिसमस नंतरचा पवित्र दिवस म्हणजे इस्टर संडे  (Easter Sunday). हा दिवस प्रभू येशू (Jesus Christ )  ख्रिस्ताच्या पुर्नजन्माप्रित्यर्थ आनंद साजरा करण्यासाठी म्हणून ओळखला जातो. प्रभू येशू यांच्या मृत्यूनंतर तीन दिवसांनी परत प्रभू येशू जिवंत झाले, असे मानन्यात येते. म्हणून या आनंदात दरवर्षी ‘इस्टर संडे’ सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. इस्टर संडे हा सण वसंत ऋतूत येतो. त्यामुळे या सणाला नैसर्गिक महत्त्वसुद्धा आहे. या काळात विशेषतः युरोप खंडात संपूर्ण सृष्टी फुलांनी बहरलेली असते.

गुड फ्रायडेच्या (Good Friday) दिवशी येशू ख्रिस्ताचा (Jesus Christ ) छळ करून त्यांना क्रुसावर लटकवून त्यांची हत्या करण्यात आली होती. मात्र गुड फ्रायडेनंतर (Good Friday) दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी येशू पुन्हा जिवंत झाला असे मानन्यात येते. हा रविवार म्हणजे ‘इस्टर संडे’. ह्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त पुनर्जीवीत झाले असे मानले जाते. त्यामुळे या दिवसाला सणाचे महत्त्व आहे.  

समस्त ख्रिश्चन बांधव उत्साहाने या दिवशी एकमेकांना भेटतात, एकमेकांना शुभेच्छा देतात. सगळीकडे उत्साही आणि आनंदी वातावरण असते. एकमेकांच्या घरी स्नेहभोजनाचे कार्यक्रम आखत, भेटवस्तू देत, चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करत इस्टर संडे साजरा केला जातो. इस्टर म्हणजे ‘पुर्नउत्थानाचा रविवार’ हा ख्रिश्चन लोकांसाठी म्हणून महत्त्वाचा सण आहे. येशू ख्रिस्त क्रुसावर मरण पावले व दोन दिवसांनी रविवारी पुन्हा जिवंत झाले. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या पुर्नजन्मानंतर 40 दिवस आपल्या शिष्यांसह राहिले होते. तेव्हापासून हे 40 दिवस इस्टरचा सण साजरा करण्यात येतो.

इस्टरच्या दिवसाची तारीख दरवर्षी बदलते. कारण वसंत काळातील पौर्णिमेच्या नंतरचा पहिला रविवार म्हणजे ईस्टर. इस्टर साजरा करण्याच्या पद्धती देशागणिक बदलतात. प्रोटेस्टंट पंथीय लोकांमध्ये प्रभू उठला आहे, असे म्हणत एकमेंकांचे स्वागत केले जाते. त्याला प्रत्युत्तर म्हणून समोरचा हो प्रभू उठला आहे असे म्हणतो. या शिवाय काही युरोपियन देशांमध्ये प्लस्टिकची किंवा कागदी अंडी सजवण्याचीही प्रथा आहे. येशू नसलेल्या रिकाम्या कबरीचे प्रतिक म्हणजे हे अंड अशी समजूत आहे. अंडे म्हणजे नवजीवनाची सुरूवात असे प्रतिकात्मक भाव ठेवला जातो.

प्रभू येशू ख्रिस्त मरणातून पुन्हा जिवंत झाले आहेत त्या आनंदाप्रित्यर्थ्य अंडी सजवण्यात येतात. लहान मुलांना सुंदरशा बास्केट सजवून त्यात ही अंडी आणि चॉकलेटस देण्यात येतात. सत्याचा असत्यावर, अहिंसेचा हिंसेवर विजय मिळवण्याते प्रतिक म्हणूनही या सणाकडे पाहिले जाते. ज्यांनी येशू ख्रिस्ताचा छळ केला त्यांना येशूने माफ केले होते त्यामुळे प्रेम आणि करूण शिकवणारा असा हा इस्टरचा काळ महत्त्वाची शिकवण देतो.

जर्मनीसारख्या काही युरोपमधील देशात इस्टरचा सण आणि ससा याचे विशेष नाते आहे. लहान मुले कागदी बास्केट तयार करून, त्या सुशोभित करून त्यात ससाची प्रितकात्मक अंडी, चॉकलेट ठेवतात. त्या ड्यांना रंगवून, झाडांना बांधतात, ते लपवून ठेवतात. विविध देशात वेगळ्या प्राण्यांचे अंडे मानन्याचा प्रघात आहे. खरं तर या प्रथेला कोणताही धार्मिक पुरावा नाही. मात्र इस्टरच्या या पवित्र आठवड्यात अंडी लपवून ते शोधण्याचा प्रघात आहे. अंडं म्हणजे पुनरूत्थान हा प्रतिकात्म संदेश यातून दिला जात असावा असे ही प्रथा बघून वाटते.

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored