Pune Botanist Dr. Hema Sane : पुण्याच्या ज्येष्ठ वनस्पतीतज्ञ डॉ.हेमा साने यांचे वृद्धपकाळाने निधन झाले आहे. आयुष्यभर विजेशिवाय ज्ञानप्राप्ती करत जगणार्या विदुषी अशी त्यांची ओळख होती.
पुणे : 19/09/2025
आयुष्यभर घरात वीजेचा वापर न करता जगणार्या विदुषी डॉ. हेमा साने (Dr.Hema Sane ) यांचे (वय 85 ) पुण्यात वृद्धपकाळाने निधन झाले. पुण्यातील मध्यवर्ती भागातील जोगेश्वरी देवीच्या परिसरात त्या जुन्या आणि मोडकळीस आलेल्या वाड्यात ज्ञानाची उपासना करत त्या जगत होत्या. आजच्या तंत्रज्ञानाच्या काळात त्या विजेशिवाय रहात होत्या, ही एक बाब त्यांना सामान्यांपासून वेगळी ठरवत होती.
डॉ. हेमा साने (Dr.Hema Sane )
डॉ. हेमा साने (Dr.Hema Sane ) यांचा जन्म 13 मार्च 1940 ला झाला. त्यांनी वनस्पतीशास्रात एम.एस्सी आणि पिएचडी संपादन केली. पु्ण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून त्या वनस्पतीशास्र विभाग प्रमुख म्हणून सेवानिवृत्त झाल्या. गेली सहा दशकांहून अधिक काळ त्या आपल्या या जुन्या वाड्यात विजेशिवाय जगत होत्या. वनस्पतीशास्रावरील त्यांची अनेक प्रसिद्ध पुस्तके आहेत. पर्यावरणाशी आपली नाळ जोडून रहावी यासाठी त्या प्राणी, पक्षी आणि वनस्पतींच्या सानिध्यात रहात होत्या. आपल्या दैनंदिन जीवनातून त्यांनी पर्यावरण जपण्याचा संदेश जगाला दिला. पुण्यातील एक विदुषी आज काळाच्या पडद्याआड गेल्या.