Donald Trump,Us H-1B visa news : सध्या भारतात H-1B व्हिजा प्रक्रियेच्या शुल्कावरून बरेच वादंग सुरू आहेत. या सगळ्या चर्चा दरम्यान ब्लूमबर्ग च्या एका रिपोर्टनुसार सांगण्यात येत आहे की, विदेशी डॉक्टरांसाछी 1 लाख डॉलर या मोठ्या शुल्कातून सूट मिळणार आहे.
अमेरिका : 23/09/2025
नुकतेच ट्रम्प प्रशासनाने 1 लाख डॉलर इतका खर्च H-1B व्हिजासाठी (Donald Trump,Us H-1B )लागू केला आङे. या इतक्या मोठ्या शूल्कातून सवलत मिळण्याची शक्यता आहे. ब्लूमबर्ग च्या एका रिपोर्टनुसार, या सवलतीमुळे अमेरिकेतील अशा रूग्णालयांना दिलासा मिळणार आहे, जेथे दूरवर राहणाऱ्या भागातील लोकं जे या रूग्णालयात काम करणाऱ्या विदेशी डॉक्टरांवर अवलंबून असतात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 19 सप्टेंबरला अतिरिक्त व्हिजा शुल्काच्या नविन कायद्याची घोषणा केल्यापासून भारतीय आयटी सेक्टरमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या नविन कायद्याअंतर्गत आता काही विदेशी नागरिकांसाठी अमेरिका 1 लाख डॉलर इतके व्हिसा शूल्क आकारणार आहे.
मेयो क्लिनिक, क्लीवलँड क्लिनिक आणि सेंट जूड हॉस्पिटल सारखे अनेक प्रतिष्ठित रूग्णालयं USH-1B व्हिजा असणाऱ्या विदेशी डॉक्टरांवर अवलंबून आहेत. एकट्या मेयो क्लिनिक या रूग्णालयात 300 पेक्षा अधिक H-1B व्हिजा असणारे डॉक्टर कार्यरत आहेत. जर 1 लाख डॉलरचे शूल्क लागू झाले तर या रूग्णालयांना हा अतिरिक्त खर्चाचा भार सोसावा लागणार आहे.
अमेरिकेत आरोग्यसेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची कमी ( Donald Trump,Us H-1B)
अमेरिकेच्या आरोग्य विभागामध्ये कर्मचाऱ्यांची भरपूर वाणवा आहे. अनेक रूग्णालयं आणि आरोग्य संस्था या ही तूट भरून काढण्यासाठी H-1B व्हिजाच्या अंतर्गत परदेशातून आरोग्य कर्मचारी, डॉक्टर यांना अमेरिकेत कामासाठी बोलवत असतात. परदेशातून येणारे हे डॉक्टर्स विशेषतः अशा ठिकाणी काम करतात, तिथे अमेरिकेतील डॉक्टर्स दूरवरच्या भागात काम करण्यास राजी नसतात. अशा परिस्थिती H-1B व्हिजासाठीचे अतिरिक्त शूल्क लागू झाले तर ही परिस्थीती आरोग्य विभागासाठी गंभिर ठरणारी असेल. अमेरिकन मेडिकल असोसिएशन (AMA) ने सुरूवातीलाच सांगितले आहे की, जर H-1B व्हिजाधारकांसाठी 1 लाख डॉलर शूल्क आकारण्यात आले तर अमेरिकेत डॉक्टरांच्या तूटीची गंभिर समस्या निर्माण होऊ शकते.
अमेरिकेतील आरोग्यसेवा संस्थांसाठी महत्त्वाचा निर्णय (Donald Trump,Us H-1B)
अमेरिकन मेडिकल असोसिएशन (AMA) अध्यक्ष बॉबी मुक्कमाला यांनी म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय ग्रॅज्युएटस असणारे मेडिकल स्टुडंट अमेरिकेतील आरोग्य संस्थांसाठी खुप महत्त्वाचे आहेत. यासर्व मुद्द्यावर व्हाईट हाऊसचे प्रवक्ता टेलर रोजर्स यांनी ब्लूमबर्गला सांगितले आहे की, या व्हिजा कायद्यात काही विशेष गोष्टींसाठी सूट आहे जी, डॉक्टर आणि मेडिकल रेजिडेंटससाठीही लागू असू शकते. त्यामुळे भविष्यात आरोग्यसेवांमधील कर्मचाऱ्यांसाठी व्हिजा शूल्कातून सुट मिळू शकणार का ? हे परदेशातील डॉक्टरांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.