Donald Trump G-20 : डोनाल्ड ट्रम्प यांनी साऊथ अफ्रिकेत होणाऱ्या G-20 परिषदेत सहभागी होण्यास नकार दिला आहे. त्यांनी साऊथ अफ्रिकेवर टीका केली असून त्यांनी परिषदेत सहभागी होऊ नये असे म्हटले आहे.
ट्रम्प यांनी G-20 शिखर परिषदेत सहभागी होण्यास दिला नकार
दक्षिण अफ्रिकेला गटातून बाहेर काढण्याची मागणी
अमेरिका : 06/11/2025
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ( Donald Trump G-20) यांनी पुन्हा एकदा एक मोठा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांनी जाहीर केले आहे की, ते नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस दक्षिण अफ्रिकेत होणाऱ्या G-20 परिषदेत सहभागी होणार नाहीत. त्यांच्या या नि्र्णयाने अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत.
ट्रम्प यांनी का नाकारले जाणे ? (Donald Trump G-20)
मियामी येथे अमेरिकन बिझनेस फोरमला संबोधित करताना ट्रम्प यांनी ही घोषणा केली. त्यांनी म्हटले की, ” मी G-20 साठी दक्षिण अफ्रिकेला जाणार नाही. दक्षिण आफ्रिकेला G-20 गटात राहण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे वादग्रस्त विधान त्यांनी केेले.
त्यांनी म्हटले की, दक्षिण अफ्रिकेत जे काही घडत आहे, ते अत्यंत वाईट आहे. यामुळे मी स्पष्टपणे सांगतो की, मी दक्षिण अफ्रिकेला G-20 परिषदेसाठी जाणार नाही आणि अमेरिकेचे प्रतिनिधित्व करणार नाही. ट्रम्प यांच्या या निर्णयाने जगभर चर्चांना उधाण आले आहे.
पहिल्यांदा अफ्रिकन खंडात होत आहे G-20 परिषद (Donald Trump G-20)
1 डिसेंबर 2024 रोजी दक्षिण अफ्रिकेने G-20 शिखर परिषदेचे अध्यक्षपद स्विकारले होते. यावेळी 22 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर 2025 दरम्यान दक्षिण अपफ्रिकेच्या जोहान्सबर्ग येथे ही परिषद होणार आहे. यासाठी अनेक जागतिक नेते उपस्थित असतील. दक्षिण अफ्रिकेत पहिल्यांदाच G-20 परिषदेत पार पडत आहे.
या देशांचा आहे G-20 मध्ये समावेश (Donald Trump G-20)
G-20 गटात एकुण 19 देशांचा आणि दोन संघटनांचा समावेश आहे. यामध्ये अर्जेंटीना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, दक्षिण कोरिया, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण अफ्रिका, तुर्की, ब्रिटन आणि अमेरिका या देशांचा समावेश आहे, याशिवाय युरोपियन युनियन आणि अफ्रिकन युनियन या स्थायी संघटनांचाही समावेश आहे.